Pune Metro: स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सार्वजनिक करण्यात अडचण काय?

Pune Metro
Pune MetroTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाबाबत (Pune Metro) महामेट्रोकडे सीओईपीने (COEP) काही तांत्रिक शंका १५ दिवसांपूर्वी उपस्थित केल्या. त्यांचे निराकरण त्यांच्याकडून करण्यात आल्यावर तज्ज्ञांकडून सविस्तर पाहणी करून तपासणी करण्यात येईल. त्यानंतर उच्च न्यायालय आणि महामेट्रोकडे अंतिम अहवाल पाठविला जाईल, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.

Pune Metro
नाशिककरांसाठी खूशखबर; इंडिगोची एक जूनपासून 29 शहरांना विमानसेवा

मेट्रो प्रकल्पाचे त्रयस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करावे, या मागणीसाठी नागरिक नारायण कोचक, शिरीष खासबारदार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याच्या निकालादरम्यान, न्यायालयाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला (सीओईपी) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. त्यांनी प्राथमिक अहवाल महामेट्रोला सादर केला आहे.

या पार्श्वभूमीवर कोचक यांनी एका पत्राद्वारे ‘सीओईपी’कडे अहवालाची प्रत मागितली होती. त्याला उत्तर देताना ‘सीओईपी’ने काही तांत्रिक शंकाचे महामेट्रोकडून निरसन झाल्यावर पुन्हा तपासणी करून अंतिम अहवाल सादर करण्यात येईल, असे लेखी उत्तर कोचक यांना दिला आहे.

Pune Metro
Pune: पुणेकरांसाठी चांगली बातमी; रिंगरोड, मेट्रोला 'बुस्टर डोस'

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कोचक म्हणाले, ‘‘महामेट्रोचे निकृष्ट काम व सदोष कार्यपद्धतीबाबत पत्र लिहून १०४ दिवस पूर्ण झाले. परंतु, महामेट्रो आजपर्यंत निःसंदिग्ध भाषेत नागरिकांच्या शंकांचे निराकरण करू शकलेली नाही. महामेट्रो व सीओईपी यांनी घेतलेल्या उलटसुलट भूमिकांमुळे प्रश्नांचे निराकरण होण्याऐवजी अजून जटिल प्रश्न निर्माण झाले आहेत. आजपर्यंत काम परिपूर्ण झाल्याचा मेट्रोचा दावा हा फसवा आहे.’’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com