Pune Metro : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोसाठी आणखी 9 महिन्यांची प्रतीक्षा

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए PMRDA) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेची चाचणी येत्या सप्टेंबरमध्ये करणार असून, पुढील वर्षी मार्च महिन्यात प्रत्यक्षात मेट्रो मार्गावर धावणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी नऊ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Pune
Devendra Fadnavis : सिडकोचा 'हा' प्रकल्प नवी मुंबईला देणार नवी जागतिक ओळख

प्राधिकरणाने हाती घेतलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम ८५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेवर ‘डक्ट’ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, लोहमार्ग (रुळ) टाकले आहेत.

सद्य:स्थितीला २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्युत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, सप्टेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर मार्च २०२६ पर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावण्यास सुरुवात होणार आहे.

Pune
PMRDA : 'त्या' बांधकामांना दिलासा; भोगवटा पत्र देण्याचा निर्णय

ही आहेत २३ स्थानके

माण, क्वाड्रॉन, इन्फोसिस फेज दोन, डोहलर, विप्रो, पल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, भारतीय कृषी संशोधन संस्था, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय अशी २३ स्थानके आहेत.

या सुविधा असणार

- ११ स्थानकांवर सरकते जिने

- प्रतीक्षालय, आसन क्षमता, व्यापारी संकुल

- ठरावीक वाहनांसाठी नियोजन

Pune
‘प्राईम फोकस' सोबतच्या तीन हजार कोटींच्या करारामुळे मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टिम

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम ८५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत चाचणी घेऊन त्रुटी, अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील मेट्रो असल्याने एकाच टप्प्यात हिंजवडी ते न्यायालय या स्थानकापर्यंत मेट्रो सुरू करणार आहे. मार्च २०२६ पर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.

- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com