Pune : कोथरूड, बाणेर, बावधन परिसरातील कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

Kothrud
KothrudTendernama
Published on

पुणे (Pune) : कोथरूड, बाणेर, बावधन परिसरात भूसंपादनअभावी अनेक रस्ते अर्धवट आहेत. त्यामुळे नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागतो. यातून सुटका करण्यासाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे, अशी माहिती कोथरूड विधानसभा मतदारसंघातील बैठकीत देण्यात आली.

Kothrud
Pune Airport : लवकरच मेट्रोने विमानतळावर पोहचता येणार; खडकवासला ते खराडी...

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (ता. २८) कोथरूडच्या प्रश्‍नांवर बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. व एमजे प्रदीप चंद्रन आदी उपस्थित होते. कोथरूडमधील रस्त्यांचे भूसंपादन करण्यासंदर्भात पाटील यांनी आढावा घेतला. त्यावेळी पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती सादर केली.

Kothrud
Nashik : आता पाणंद रस्त्यांचा मार्ग होणार मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

अर्धवट रस्ते

- यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडून गांधीभवनकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी एका ठिकाणी दीड गुंठा जागा ताब्यात आलेली नाही.

- कर्वे पुतळा येथील पेट्रोल पंपाच्या बाजूने २० मीटरचा डीपी रस्ता आहे, तो केल्यास थेट मयूर कॉलनीशी हा भाग जोडला जाईल.

- पौड फाटा येथील सावरकर उड्डाणपूल ते मयूर कॉलनी डीपी रस्त्यावरील भीमनगरमधील एका स्वच्छतागृहाचा प्रश्‍न कायम.

Kothrud
Mumbai : 'नैना' प्रकल्प क्षेत्रातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजनांसाठी टेंडर

- वारज्यातील डॉ. आंबेडकर चौकापासून तिरूपतीनगरमार्गे डुक्कर खिंडीला जोडणारा रस्ता आहे, यातील जागा बीडीपीतील असून जागा मालकांनी निवासी दराने नुकसान भरपाई मागितली आहे.

- कस्पटे वस्तीमधील पुलाच्या पोहोच रस्ता, बाणेर पाषाण लिंक ३६ मीटर रस्ता, पाषाण सर्कल येथील ३० मीटर रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे.

Tendernama
www.tendernama.com