Pune : 6 कोटींच्या 'त्या' टेंडरमध्ये स्पर्धा कशी होणार?

Tender : एका विशिष्ट प्रकाशन संस्थेची पुस्तके खरेदी करायची असल्यास टेंडर प्रकियेत अन्य संस्था किंवा ठेकेदार कसे सहभागी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
School Students
School StudentsTendernama
Published on

पुणे (Pune) : एका खासगी प्रकाशन संस्थेच्या पुस्तक व शैक्षणिक साहित्य खरेदीच्या सहा कोटी १५ लाख रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली. मात्र, विशिष्ट एका संस्थेची पुस्तके खरेदी करताना, त्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया कशी राबवली जाणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

School Students
Devendra Fadnavis : 'कसे' निर्माण होणार 15 लाख रोजगार? काय म्हणाले मुख्यमंत्री?

महापालिकेच्या शिक्षण विभागाला एका खासगी प्रकाशन संस्थेने शैक्षणिक साहित्य खरेदीसंदर्भात एक प्रस्ताव दिला होता. त्यात महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या बालवाडी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शिक्षण व लेखन साहित्य, कला व कार्यानुभव पुस्तिका, जादुई पिटारा, अशा पुस्तकांचा व साहित्याचा समावेश आहे.

School Students
Mumbai : सरकारचा मोठा निर्णय; 'त्या' निरीक्षक-अधीक्षकांना मिळणार सरकारी निवासस्थान

महापालिकेकडून कोणतेही साहित्य खरेदी करताना ते विशिष्ट कंपनीचेच केले जात नाही. साहित्याचे वर्णन करून थेट टेंडर मागवल्या जातात. एका विशिष्ट प्रकाशन संस्थेची पुस्तके खरेदी करायची असल्यास टेंडर प्रकियेत अन्य संस्था किंवा ठेकेदार कसे सहभागी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

School Students
CM फडणवीसांचा प्रशासकीय डीप क्लीन ड्राईव्ह; 'त्या' उपसचिवाची उचलबांगडी

या संस्थेने महापालिकेला पत्र दिल्यानंतर सहा कोटी १५ लाख ४७ हजार रुपये किमतीची पुस्तके खरेदी केले जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नसल्याने शिक्षण विभागाकडे गणवेश खरेदीच्या शिल्लक निधीतून वर्गीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवून त्यास मंजुरी मिळवून घेतली आहे.

यासंदर्भात शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत, विभागाच्या प्रमुख सुनंदा वाखारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com