Mumbai : सरकारचा मोठा निर्णय; 'त्या' निरीक्षक-अधीक्षकांना मिळणार सरकारी निवासस्थान

Government Officers : गत 4 ते 5 वर्षापासून या विभागातील जिल्हा व उपविभागीय स्तरावरची बांधकामे सुरू आहेत.
Mantralaya
MantralayaTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल प्राप्त करून देणाऱ्या विभागापैकी तिसरा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील निरीक्षक व अधीक्षकांच्या कार्यालयांचे बांधकाम टाईप प्लॅननुसार करण्यात येत आहे. शासनाने विभागाच्या राज्यातील 42 ठिकाणच्या विविध बांधकामासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यापैकी 9 बांधकामे पूर्ण झालेली आहेत.

Mantralaya
Devendra Fadnavis : 'कसे' निर्माण होणार 15 लाख रोजगार? काय म्हणाले मुख्यमंत्री?

पूर्ण झालेल्या बांधकामांमध्ये राज्य उत्पादन शुल्क भवन मुंबई, नाशिक अधिक्षक यांचे निवासस्थान, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जालना, हिंगोली, अमरावती, कर्मचारी निवासस्थान वाशिम, निरीक्षक कार्यालय संरक्षक भिंत तळेगांव दाभाडे जि. पुणे, निरीक्षक कार्यालय व निवासस्थान संगमनेर जि. अहिल्यानगर, भरारी पथक निरीक्षक कार्यालय सटाणा जि. नाशिक यांचा समावेश आहे. विभागातील सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Mantralaya
'त्या' राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील अडचणी तातडीने सोडवा; मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे निर्देश

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. विभागासाठी मंजूर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या 3 हजार 842 इतकी आहे. विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण अंदाजे 23,289 कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे. विभागाची आयुक्त कार्यालयाची फोर्ट, मुंबई येथे सात मजली इमारत असून या इमारतीच्या बांधकामास सन 2024 ची उत्कृष्ट शासकीय इमारत म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

गत 4 ते 5 वर्षापासून या विभागातील जिल्हा व उपविभागीय स्तरावरची बांधकामे सुरू आहेत. शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्क विभागातील बांधकामासाठी 110.47 कोटी निधीची तरतूद केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com