Pune : जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांमध्ये फेरबदल, कारण...

Pune ZP
Pune ZPTendernama
Published on

पुणे (Pune) : जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांमध्ये फेरबदल केला जात आहे. आत्तापर्यंत दीडशेहून अधिक कामे ही बदल प्रस्तावांद्वारे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. कामात बदल करण्याची कारणेही प्रस्तावात देण्यात आली आहेत.

Pune ZP
Pratap Sarnaik : पनवेल बसपोर्टसाठी लवकरच रिटेंडर

मागील महिनाभरात कामे बदल करण्याचा धडाका सुरू आहे. जनसुविधा आणि इतर लेखाशीर्षमधील कामे वैधानिक प्रक्रिया बाजूला ठेवून बदल प्रस्तावाद्वारे मंजूर केली जात आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे कामांची यादी पाठविण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेचे आहेत. मुख्य म्हणजे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने शिफारस केलेल्या कामांनाच जिल्हा नियोजन समितीकडून मंजुरी दिली जाते. या कामांमध्ये बदल करायचा झाल्यास पुन्हा जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची शिफारस आणि जिल्हा नियोजन समितीची मंजुरी आवश्यक आहे. गावपातळीवर काम करताना अडचणी येतात, मात्र निधी उपलब्ध असल्याने कामाची जागा बदलली जाते. परिणामी निधी मागे न जाता तो गावच्या विकासासाठी उपयोगी पडतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीने पुस्तिकेमध्ये मंजूर केलेल्या कामांची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली.

Pune ZP
Mumbai : 'जेएनपीए' ते चौक सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास मंजुरी; 4500 कोटींचे बजेट

आत्तापर्यंत सुमारे १८० ते १९० कामे बदल प्रस्तावामध्ये मंजूर करण्यात आली आहेत. कामात बदल केल्याने काही लोकप्रतिनिधींनी यावर हरकतीही घेतल्या आहेत. या कामांना जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची शिफारसही नाही. तसेच प्रस्ताव बदलले जात असल्यामुळे वैधानिक प्रक्रियाच पाळली जात नसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com