Pune : बहुचर्चीत BRT बाबत ओमप्रकाश बकोरीया यांचे मोठे विधान!

Omprakash Bakoria PMP
Omprakash Bakoria PMPTendernama

पुणे (Pune) : शहराच्या विकासासाठी व सार्वजनिक वाहतुक (Public Transport) सुधारण्यासाठी बस रॅपीड ट्रान्झिस्टची (BRT) आवश्‍यकता आहे. BRTचे सक्षमीकरण करण्यावर प्रशासनाचा भर असणार आहे, असे PMPMLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया (Omprakash Bakoria) यांनी नुकतेच सांगितले.

Omprakash Bakoria PMP
Nitin Gadkari : देशात पहिली ब्रॉडगेज मेट्रो या शहरांदरम्यान धावणार

सामाजिक संस्था, प्रवासी मंच, पीएमपी अधिकारी, वाहतुक तंज्ञ यांच्याकडून बीआरटीच्या सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बकोरीया यांनी आपली भूमिका मांडली.

या कार्यशाळेमध्ये पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, वाहतूक तंज्ञ प्रांजली देशपांडे, हर्षद अभ्यंकर, रणजीत गाडगीळ, पीएमपीचे अधिकारी, परिसर संस्थेचे पदाधिकारी, पीएमपी प्रवासी मंचचे पदाधिकारी, वाहतूक तज्ञ, शहर वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Omprakash Bakoria PMP
Pune : शिवाजीनगरहून सुटली लोणावळा लोकल; असे आहे वेळापत्रक...

यावेळी शहरासाठी बीआरटीची किती गरज आहे, बीआरटीचा पुणेकरांना फायदा होणार आहे का, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच बीआरटीचे जाळे वाढवून त्यावर उपाययोजना करण्याचेही निश्‍चित करण्यात आले.

Omprakash Bakoria PMP
Aurangabad: हर्सूल रस्ता रुंदीकरणात खोडा; कोणी केली कोंडी?

शहरातील बीआरटी कॉरिडॉर दररोज चार लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देतो. बीआरटीचे जाळे विस्तारल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते, असे मत उपस्थित तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले. शहरात बीआरटीच्या नियोजीत १४५ किलोमीटर जाळ्यापैकी केवळ ४५ किलोमीटरपर्यंतच बीआरटीचे जाळे आहे. मेट्रोमुळे बीआरटीच्या अनेक कॉरीडॉरवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बीआरटीचे जाळे वाढविणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Omprakash Bakoria PMP
Aurangabad: यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर पाचव्याच दिवशी शिक्कामोर्तब

बीआरटीमुळे बसचा वेग वाढला !

पीएमपी प्रशासनाने बीआरटी कॉरीडॉरमुळे पीएमपी बसला चांगला फायदा होत आहे. त्यामुळे बसचा वेग २५ किलोमीटर प्रतितास इतका वाढला असल्याचे सादरीकरणावेळी पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com