Aurangabad: यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर पाचव्याच दिवशी शिक्कामोर्तब

Sangramnagar Flyover
Sangramnagar FlyoverTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : बीड बायपासवरील (Beed Bypass) संग्रामनगर चौकातील उड्डाणपूल (Flyover) ३१ जानेवारीला वाहतुकीस खुला करण्यात आला. मात्र रविवारी पाचव्याच दिवशी पुलाखाली वाहतुकीचा चक्काजाम (Traffic) झाला आणि यंत्रणेचा बेजबाबदारपणा समोर झाला. यामुळे बीड बायपासह सातारा - देवळाईकरांना या पुलाचे काम चुकीचे असल्याचा साक्षात्कार झाला.

Sangramnagar Flyover
Nashik : आता नाशिकमधून नागपूर, गोवा, अहमदाबाद विमानसेवा

शनिवारी सायंकाळी देवानगरी उड्डाणपुलाकडून सातारा - देवळाईकडे  जाणारी आणि सातारा - देवळाई गावातून देवानगरी उड्डाणपुलाकडे तसेच एमआयटीकडे जाणारी वाहने संग्रामनगर पुलाखाली कामगार बसेस अडकल्याने संग्रामनगर पुलाखालच्या सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. यात शहानुरवाडी एकता चौक ते देवानगरी उड्डाणपूल, देवळाईचौक ते संग्रामनगर चौक, एमआयटीकडून संग्रामनगर मार्गे देवानगरी उड्डाणपुलाकडे, तसेच सातारा गावात वळणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

चहुबाजूने एक हजार वाहने कोंडीत अडकल्याचा दावा स्थापत्य अभियंता तथा उद्योजक दिपक सुर्यवंशी, बद्रिनाथ थोरात, असद पटेल, सोमिनाथ शिराने, ॲड. शिवराज कडू पाटील, विनोद जाधव, आबासाहेब देशमुख, सुरेश बोर्डे, पद्मसिंह राजपुत, विष्णु पाटील, अरूण काटे, संजय कुलकर्णी, अशोक लबडे, श्रीप्रकाश शिंदे, अमोल सर्जे, हेमंत अदवंत, अनिल जाधव, पंकज गायके व शेकडो नागरिकांनी केला आहे. शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत जवळपास चार तास वाहतुकीचा चक्काजाम झाल्याची माहिती त्यांनी दिली.

Sangramnagar Flyover
Pune: मोठी बातमी; रिंगरोडच्या कामात पुन्हा नवे विघ्न?

दरम्यान पुलाखालील अंडरपासमधून कामगार बसेसला वळण घेता येत नसल्याने बसेस अडखळल्यामुळे पुलाखाली वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान साताऱ्यातील समाजसेवक असद पटेल यांनी काही काळ कोंडी सोडवण्यासाठी मोठा हातभार लावला. विशेष म्हणजे उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्यानंतर पाचव्याच दिवशी अंडरपासला जुळणाऱ्या सर्व बाजुच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. 

उड्डाणपुलावर वाहने सुसाट धावत असताना, मात्र अंडरपासच्या रस्त्यांवर कोंडी झाली होती. उड्डाणपूल आणि रस्त्याचा लोकार्पण सोहळा बाकी असतानाच तो वाहतुकीसाठी घाईगरबडीत खुला करण्यात आला. अंडरपासची लांबी, रूंदी, उंची कमी आहे. अंडरपासच्या दोन्ही बाजुंचे रस्ते अरूंद आहेत. पुलाची लांबी देखील  कमी असल्याने तसेच आमदार रोड ते बीड बायपास पर्यायी अंडरपास तसेच संग्रामनगर चौकातील सद्यःस्थितीत असलेल्या अंडरपास पुढे अतिरिक्त अंडरपास न केल्याने एकूणच या पुलाचे सदोष डिझाईन केले गेल्याने येथे कधीही कोंडी होऊ शकते.

पावसाळ्यात चार महिने तर याचा वापर करण्यास मोठी अडचण निर्माण होणार, अशा आशयाच्या सातारा - देवळाई आणि बीडबायपासह नव्या  व जुन्या शहरातील अअसंख्य तक्रारी आल्यानंतर टेंडरनामाने वृत्तमालिका पुलाचे बांधकाम सुरू असताना वारंवार प्रसिद्ध करून संभाव्य कोंडी आणि त्यात होणार्या अपघाताकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

Sangramnagar Flyover
Budget : भुसावळ-इगतपुरी तिसऱ्या रेल्वेलाइनसाठी 1500 कोटी

सदोष डिझाईननुसार पुलाच्या बांधकामप्रकरणी व्यक्त केलेली शंकेचा उड्डाणपुल वाहतुकीस खुला केल्याच्या पाचव्याच दिवशी साक्षात्कार ठरला आणि वृत्तमालिका खरी ठरली. मात्र अद्याप यंत्रणेला जाग आली नसून, पुलाचे सदोष डिझाईन करणारा संबंधित अभियंता आणि प्रकल्प सल्लागार तसेच हाती आलेल्या डिझाईननुसार काम करणारा कंत्राटदारावर चुकीचे काम केल्याचा ठपका ठेवण्यात सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यासह मुख्य अभियंत्याचे हात का थरथरतात हा संशोधनाचा विषय आहे.

तर आमदार संजय शिरसाट विभागीय आयुक्त आणि मुख्य अभियंत्याकडे बोट दाखवत सदोष डिझाईन नसल्याचे सांगत आहेत. यासंदर्भात भाजप आमदार प्रशांत बंब येथील नुस्ताच सदोष उड्डाणपुलाचा प्रश्न नसून संपूर्णच बीडबायपासच्या प्रश्नाबाबत मी आवाज उठवणार असल्याचे सांगत आहेत. पण कधी आवाज उठवणार ,असा प्रश्न या भागात उपस्थित केला जात आहे.

शनिवारच्या कोंडीनंतर या पुलाचे कामच चुकीचे झाल्याचे सातारा - देवळाईकरांना प्रत्यक्षात अनुभव आल्याने येथील लाखो रहिवाशांनी मान्य केले आहे. त्यामुळे पुलाच्या रचनेत बदल करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रीयांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दरम्यान, सदोष डिझाईननुसार पुलाचे बांधकाम केल्याप्रकरणी याचिकाकर्ता ॲड. रूपेश जैस्वाल यांनी यापुलाचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला आहे. मात्र त्यावर सुनावणीसाठी तारीख पे तारीख सुरू आहे. याचाच फायदा घेत सुनावणी प्रलंबित असताना या पुलाची वाहतूक खुली केली.

विशेष म्हणजे वरती उड्डाणपुल आणि पुलाखाली व्हेईकल अंडरपास असताना तो उड्डाणपुल नव्हे, तो तर भुयारी मार्ग असल्याचे कारभारी औरंगाबादकरांच्या मेंदूत भरवत आहेत. या सदोष डिझाईनच्या आधारावर पुलाचे बांधकाम प्रकरणी विभागीय आयुक्तांना गांधीगीरी मार्गाने निवेदन देणार, त्यांनी यात लक्ष न घातल्यास अंडरपासमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा सातारा-देवळाई आणि बीड बायपासवासियांनी दिला आहे.

Sangramnagar Flyover
Pune: मोठी बातमी; PM आवास योजनेतून 2 हजार 607 घरे उपलब्ध होणार

बीड बायपास संग्रामनगर चौकात रस्त्यांचा आणि देवानगरीकडील उड्डाणपुलाच्या धावपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचा सुपासारखा आकार असताना पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या आपोआप रेल्वेरूळाकडे वाहून जात होते. याउलट जिथे रस्त्यांवर सखोल भाग असेल, त्यात पाणी साचू नये, यासाठी भरती टाकून रस्ते उंच करा व स्ट्राॅम वाॅटर यंत्रणेच्या खर्चात बचत करा, असे शासनाचे धोरण आहे. येथे मात्र गरज नसताना अंडरपासखाली दहा ते बारा फूट खोदकाम करून थेट देवानगरी नाल्यात बाराशे मीटर अंतरापर्यंत वीस ते २५ लाखाची भूमिगत ड्रेन तयार केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

यासदोष पुलाच्या बांधकाम प्रकरणी एखाद्या चिमुकल्याला जरी विचारले तर अंडरपासकडे बोट दाखवत पुलाकडे नजर वळवत उंची कमी असल्याचे सांगतो. मग अशा बांधकामाला शासकीय यंत्रणेने परवानगी दिली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. यासंदर्भात जागतिक बॅंक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे डिझाईन उपअभियंता शैलेश सुर्यवंशी यांनीच तयार केल्याचे थेट व्हाॅटसपवर उत्तर देत आहेत. तर शैलेश सुर्यवंशी डिझाईननुसार काम बरोबरच असल्याचे सांगत आहेत. या सदोष डिझाईननुसार बांधकामामुळे सातारा-देवळाई आणि बीड बायपासवासियांच्या अडचणीत वाढ झाल्याचे शनिवारी समोर आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com