Pune : महापालिकेचा मोठा निर्णय; पर्वती जलशुद्धीकरण केंद्र बंद होणार, कारण...

Vikram Kumar, PMC
Vikram Kumar, PMCTendernama

पुणे (Pune) : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ५४ वर्षे जुने झाल्याने हे केंद्र टप्प्याटप्प्याने बंद करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी वडगाव बुद्रुक येथे १२५ एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी २१९ कोटी १३ लाख रुपयांच्या खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास अंदाज समितीने (इस्टिमेट कमिटी) मान्यता दिली. या खर्चाच्या ५० टक्के निधी हा केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून उपलब्ध होणार आहे.

Vikram Kumar, PMC
Nashik : सिन्नरमधील रतन इंडियाचा वीजप्रकल्प एक रुपयातही नको; फडणवीस यांची स्पष्टोक्ती

पुणे शहराची लोकसंख्या वाढत असताना २०३२ व २०४७ मधील पाण्याच्या मागणीचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. सध्याच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता २५० एमएलडी आहे, २०३२ मध्ये ही क्षमता २७७ एमएलडी प्रस्तावित आहे, तर समाविष्ट झालेल्या गावांमुळे १११.२१ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे ३८८ एमएलडी पाण्याची मागणी आहे, पण यासाठी २०३२ पर्यंत वाट पाहून जमणार नसल्याने १२५ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प वडगाव बुद्रुक येथे बांधण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने नमूद केले.

जलशुद्धीकरण केंद्राचे आयुर्मान हे ३० वर्षांचे असताना पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्र ५४ वर्षांपासून सुरू आहे. वडगाव केंद्रावरून बिबवेवाडी टाकी, तळजाई, अप्पर इंदिरानगर भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. हे काम झाल्यानंतर पर्वती जुन्या केंद्राचा वापर बंद करता येणार आहे.

Vikram Kumar, PMC
Nashik : मनमाड-दौंड रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणामुळे प्रवासात होणार 'एवढ्या' मिनिटांची बचत

टेंडर प्रक्रिया सुरू करता येणार

वडगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेची जागा उपलब्ध आहे. या कामासाठी एकूण खर्च २१९ कोटी १३ लाख रुपये अपेक्षित आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाकडून ५० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५० कोटी रुपये तरतूद उपलब्ध आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतलेल्या अंदाज समितीच्या बैठकीत यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता टेंडर प्रक्रिया सुरू करता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com