कोंढव्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांचा निर्णय; 'या' भागात जड वाहनांना बंदी

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : कोंढव्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह अपघात टाळण्यासाठी शीतल चौक, अशोका म्यूज सोसायटी, पारगेनगर, कौसरबाग परिसरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Pune
'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

रमजान महिना संपेपर्यंत या भागात दररोज सायंकाळी सात ते रात्री १२ पर्यंत हा बदल राहील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

१) ज्योती हॉटेल चौकातून डावीकडे वळून मेफेअर जंक्शनमार्गे पारगेनगरकडे जाणारी सर्व जड वाहतूक आणि पाण्याच्या टँकरला बंदी.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी ज्योती हॉटेल चौकातून शीतल चौकमार्गे पारगेनगर या मार्गाने जावे.

Pune
शिवशाही बसचा प्रवास... नको रे बाबा! काय आहे कारण?

२) पारगेनगर येथून मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेलकडे जाणारी सर्व प्रकारची जड वाहतूक आणि पाण्याच्या टॅंकरला बंदी.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी पारगे नगर चौकातून शीतल चौकमार्गे ज्योती हॉटेल चौकातून जावे.

३) सर्वोदय जंक्शन चौकातून कौसरबागकडे जाणारी सर्व जड वाहतूक बंद.

पर्यायी मार्ग : वाहनचालकांनी मेफेअर जंक्शनमार्गे ज्योती हॉटेल चौक या पर्यायी मार्गाने जावे.

Tendernama
www.tendernama.com