PMRDAची ड्रोन भरारी! पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर राहणार नजर

PMRDA
PMRDATendernama

पुणे (Pune) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण, प्रकल्पांची आखणी यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अत्याधुनिक ड्रोन पीएमआरडीएकडून खरेदी करण्यात आला आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या ताफ्यात आता तीन ड्रोन दाखल झाले असून, यामुळे अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवणे, टीपी स्कीम आखणी, ॲमेनिटी स्पेसच्या जागांवरील अतिक्रमणे रोखणे, रस्ते सर्वेक्षण व रुंदीकरण आदी कामे करणे या माध्यमातून शक्य होणार आहे.

PMRDA
नाशिककरांसाठी Good News; केंद्राकडून 'या' मोठ्या प्रकल्पाची घोषणा

पीएमआरडीएच्या हद्दीत सुमारे ८१४ गावांचा समावेश होतो. एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्याकरिता पीएमआरडीएने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात केली. सध्या पीएमआरडीएने कॉर्स हे अद्ययावत तंत्रज्ञान असलेले ड्रोन खरेदी केले आहेत. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आणि अतिरिक्त आयुक्त दीपक सिंघला यांच्या हस्ते नुकतेच याचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी एसआरएसएसीचे वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. संजय पाटील, सर्व्हे ऑफ इंडियाचे एस. त्रिपाठी, नगररचना सहसंचालक राजेंद्र पवार, जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

PMRDA
देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

जीआय बेस ड्रोन
या ड्रोनने काढलेल्या छायाचित्रावर अक्षांश व रेखांशाचा उल्लेख असणार आहे, असे हे जीआयएस बेस ड्रोन आहे. याची फ्लाइंग क्षमता ४५ मिनिटे असून, एकावेळी सुमारे ५० हेक्‍टर जमिनीवरील सद्यःस्थिती समजू शकते. कॉर्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने यामध्ये अचुकता अधिक आहे.

नगररचना योजनांची (टीपी स्कीम)आखणी व विकास, नदीसुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण यासाठी पीएमआरडीएकडून ड्रोन या नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com