PMRDA: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जोरदार कामगिरी; ई-गव्हर्नन्स...

pmrda
pmrdaTendernama
Published on

पिंपरी (Pimpri): पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वोत्तम शासकीय संस्था, मंडळे व कंपन्या या गटांतून पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा खोवला, तर राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.

pmrda
Nashik: रिंगरोडसाठी सक्तीने भूसंपादन होणार?

राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयांची कामगिरीचे भारतीय गुणवत्ता परिषदेने अंतिम मूल्यमापन केले. यात विजेत्या कार्यालयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी केली. राज्य शासन सर्व विजेत्यांचा गौरव लवकरच करणार आहे.

कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन तसेच भौगोलिक माहिती प्रणाली यांचा शासकीय कामकाजातील प्रभावी वापर हे निकष होते. गेल्या जूनमध्ये १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती आराखडा घोषित झाला. या आराखड्याअंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांचे दहा स्तरांवर मूल्यमापन करण्यात आले.

pmrda
Mumbai: सफाई कामगारांच्या 580 घरांसाठी बीएमसीचे टेंडर

दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेने सखोल तपासणी केली. या कार्यक्रमात पीएमआरडीएने प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणि डिजिटल सेवा वितरणामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुधारणा प्रक्रियेमुळे कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले असून, नागरिकांना सुलभ व वेळेत सेवा मिळण्यास मोठी मदत झाली आहे.

१०० दिवस उपक्रमातही छाप

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी १०० दिवसांचा प्रशासकीय सुधारणा व धोरणात्मक निर्णयांवर आधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्या स्पर्धेतही पीएमआरडीएने छाप पाडत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला.

pmrda
Nashik: द्वारका चौकातील वाहतूक 3 महिने राहणार बंद; काय आहे कारण?

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख प्रशासन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीएमआरडीएच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या संघभावनेतून आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून हे यश मिळाले आहे.

- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com