लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर; ‘पीएमआरडीए’कडून टेंडर

Glass Skywalk
Glass SkywalkTendernama
Published on

पुणे (Pune) : लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे उभारण्यात येणाऱ्या ‘ग्लास स्कायवॉक’च्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. दरम्यान, या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या पर्यटनस्थळामध्ये आणखी एका पर्यटनस्थळाचा समावेश होणार आहे.

Glass Skywalk
Pune : कुठे अडकला मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाचा निधी? का होतोय विलंब?

लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबई नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. लोणावळा परिसरातील निसर्गसंपदा लक्षात घेता येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेला ‘ग्लास स्कायवॉक’ उभारावा. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करावे, अशा सूचना पवार यांनी या बैठकीत दिल्या होत्या.

Glass Skywalk
Pune : 'त्या' ऐतिहासिक बोगद्याच्या सुरक्षेलाच प्रशासनाने दाखवलाय 'कात्रजचा घाट'

परंतु पर्यटन विभागाने त्याला असमर्थतता दर्शविली. त्यामुळे पवार यांनी पर्यटन विभागाऐवजी ‘पीएमआरडीए’ने या प्रकल्पाचे काम हाती घ्यावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ‘पीएमआरडीए’ने हे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाची मान्यता घेऊन आराखडा तयार केला. त्याला पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

असा असेल ग्लास स्कायवॉक

- टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट येथे प्रस्तावित

- ४.८४ हेक्‍टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार

- झिप लायनिंगसारखे साहसी खेळ, फूड पार्क, ॲम्फी थिएटर, ओपन जीम आणि विविध खेळ

- प्राथमिक अंदाजानुसार सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिक खर्च

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com