PMC News : पुणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या कौशल्यावरच नागरिक का घेत आहेत शंका?

pune
puneTendernama

Pune News पुणे : सध्या होत असलेला अवकाळी पाऊस व त्यामुळे ठिकठिकाणी साचत असलेल्या तळ्यांनी हडपसर (Hadapsar) परिसरातील पावसाळी वाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

pune
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

येथील काही ठिकाणांवर गेली अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याची तळी साचत असतात. या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करण्यास पालिका आजही असमर्थ ठरत आहे आहे. त्यामुळे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या कौशल्यावर नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहत असते. दरवर्षी त्याच ठिकाणी ही समस्या निर्माण होत असतानाही पालिकेला हा प्रश्न मुळापासून सोडवण्यात यश आलेले दिसत नाही. दुरुस्तीचे काम करूनही साचलेल्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात कायम येथून कसरतच करीत प्रवास करावा लागत आहे.

pune
Bullet Train News : BKC ते शिळफाटा बोगद्याचे काम मिशन मोडवर; घणसोलीतील 'ती' मोहिम फत्ते!

पुणे सोलापूर महामार्गावर रवी दर्शन येथे दरवर्षी मोठ्या पावसात पाणी साचल्याची घटना घडते. मांजरी फाट्यावरील इंद्रप्रस्थ सोसायटी जवळ, अण्णासाहेब मगर महाविद्यालया शेजारी व मागील बाजूलाही साचलेल्या पाण्याचा प्रश्न कायमचा झालेला आहे. गेल्या वर्षी दुरुस्ती करूनही हा प्रश्न आजही निर्माण होत आहे.

डीपी रस्त्यावरील क्रीडा संकुल, साडेसतरानळी माळवाडी रस्ता चौक, सोलापूर रस्त्यावरील अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती, गोंधळेनगर येथील करकरे उद्याना समोरील भाग, सय्यदनगर रेल्वेगेट लगतचा हांडेवाडी रस्ता, ससाणेनगर, मगरपट्टा सिटी मागील रस्ता व कोद्रे उड्डाणपुलाच्या सुरुवातीला, महंमदवाडी गावठाणाजवळ या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचलेले दिसते. यातील तीन-चार ठिकाणी पाणी पाऊस संपल्यानंतरही कायम राहते. तेथे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण होत असतो

pune
Mumbai Metro News : आरे ते BKC लवकरच धावणार मेट्रो; आरे डेपोचे काम पूर्ण

पाणी चिखलातून प्रवास करताना विद्यार्थी कामगार व इतर प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. छोटे मोठे अपघातही त्यामुळे होत असतात. दरवर्षी ही समस्या निर्माण होत असताना तालुका प्रशासन त्याबाबत गांभीर्याने का घेत नाही, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, सामाजिक कार्यकर्ते समीर वाडकर, दत्ता पाटील, शैलेंद्र बेल्हेकर, पितांबर धीवार, शीतल ससाणे आदींनी केला आहे.

याबाबत क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com