Mumbai Metro News : आरे ते BKC लवकरच धावणार मेट्रो; आरे डेपोचे काम पूर्ण

Mumbai Metro
Mumbai Metro Tendernama

Mumbai Metro News मुंबई : मुंबई मेट्रोच्या आरे डेपोचे तब्बल 99.5 टक्के काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे आरे आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्यातील ऑपरेशनची तयारी सुरु केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) दिली आहे. प्रत्येकी आठ डब्यांच्या 30 गाड्यांसाठी तयार केलेल्या या डेपोवर सुमारे 328 कोटी रुपये खर्च होत आहे. मुंबई मेट्रो मार्ग-३ (कुलाबा-वांद्रे- सिप्झ ) हा मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे.

Mumbai Metro
Sambhajinagar : स्मार्ट सिटीचे स्मार्ट बूथ कुणामुळे पडले आडवे; ना स्मार्ट सिटीचे लक्ष, ना वाहतूक शाखेचे!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली होती, पण आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यावरून वाद निर्माण झाला. कारशेडसाठी आरेमधली झाडे तोडण्याला शिवसेना, काही पर्यावरणवादी संघटनांनी विरोध केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला ब्रेक लागला. तसेच कारशेडसाठी कांजूरमार्गमधल्या पर्यायी जागा निवडावी, अशी मागणी जोर धरू लागली. कांजूरमार्गची जागा खासगी व्यक्तीची आहे का? यावरूनही वाद होता. अखेर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार घालवून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्वरित मंजुरी दिली. शिंदे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाला प्राधान्य देण्यात आले. मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आरे येथेच करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, कार डेपोच्या मुद्द्यामुळे प्रकल्पाला तीन वर्षांचा विलंब झाला होता.

Mumbai Metro
Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्ग लवकरच देणार गुड न्यूज; 76 किमीचा अखेरचा टप्पाही पूर्णत्वास

कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. येथे ट्रेनची देखभाल रोज होते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामे येथे हाती घेण्यात येतात. यामुळे सर्व ट्रेन्स सुरळीतपणे धावण्यास मदत होते. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित ठरण्या साठी कार डेपो एक महत्त्वाचा दुवा ठरतो.

येथेच ट्रेन्स उभ्या करण्याची सुविधा असते. त्याच प्रमाणे चाकांची काळजी घेणे, ट्रेनची सफर सुरक्षित होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चाचण्या सुविधा उपलब्ध असतात. येथेच संचलन आणि नियंत्रण कक्ष देखील उपलब्ध असतो.

मुंबई मेट्रो-३ची (Mumbai Metro-3) बहुतांश कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे म्हणजेच मेट्रो स्थानकांचे सुशोभीकरण, स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची कामेही सध्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे आरे-बीकेसी हा मेट्रोचा पहिला टप्पा पुढील लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे ३७,००० कोटी खर्च झाले आहेत.

Mumbai Metro
Amravati News : अमरावतीच्या तहसीलदारांचे लेआउट प्रकरणात निलंबन; मात्र अवघ्या 24 तासांत स्थगिती कशी काय?  

बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंतचा मेट्रोचा दुसरा टप्पा देखील प्रगतीपथावर आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात सीप्झ ते बीकेसीपर्यंत ८ स्थानके असतील आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी आणि कफ परेड दरम्यान १८ स्थानके असणार आहेत.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्प दृष्टिक्षेपात -
● कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे.
● या मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवर आहे.
● या मार्गामुळे प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांसारख्या भागांना जोडणी मिळेल.
● २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत असतील.
● इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील.
● सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल.
● या मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com