Bullet Train News : BKC ते शिळफाटा बोगद्याचे काम मिशन मोडवर; घणसोलीतील 'ती' मोहिम फत्ते!

Tunnel
TunnelTendernama

Mumbai Ahmedabad Bullet Train मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील बीकेसी स्थानक ते शिळफाटा (BKC To Shilphata Tunnel) या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.

Tunnel
Samruddhi Expressway News : समृद्धी महामार्ग लवकरच देणार गुड न्यूज; 76 किमीचा अखेरचा टप्पाही पूर्णत्वास

याअंतर्गत घणसोली येथे ३९४ मीटरच्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे (एडीआयटी) काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देण्यात आली.

एडीआयटीसाठी 6 डिसेंबर 2023 रोजी खोदकाम सुरू करण्यात आले असून 394 मीटर ही संपूर्ण लांबी सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27 हजार 515 किलो स्फोटकांचा वापर करून एकूण 214 नियंत्रित स्फोट करण्यात आले आणि सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला.

26 मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) द्वारे 3.3 किमी (अंदाजे) बोगद्याचे बांधकाम सुलभ झाले. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी 1.6 मीटर (अंदाजे) बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश सुलभ झाला.

Tunnel
Sambhajinagar : स्मार्ट सिटीचे स्मार्ट बूथ कुणामुळे पडले आडवे; ना स्मार्ट सिटीचे लक्ष, ना वाहतूक शाखेचे!

बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. या कामासाठी एसएसपी (सरफेस सेटलमेंट पॉइंट), ओडीएस (ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर) किंवा दोन्ही अक्षातील विस्थापनासाठी टिल्ट मीटर, बीआरटी (टार्गेट/थ्रीडी टार्गेटप्रतिबिंबित करून), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताणांसाठी स्ट्रेन गेज, पीक पार्टिकल व्हेलोसिटीसाठी सिस्मोग्राफ (पीपीव्ही) किंवा व्हायब्रेशन अँड सिस्मिक वेव्ह मॉनिटर ही उपकरणे वापरली जात आहेत.

महाराष्ट्रातील BKC मधील बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. या बोगद्याचा 7 किमीचा (अंदाजे) भाग ठाणे खाडी (इंटरटाइडल झोन) येथे समुद्राखाली असेल. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात आला आहे.

Tunnel
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

बोगद्याच्या 21 किमी बांधकामापैकी 16 किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित 5 किमी एनएटीएमद्वारे होत आहे. 21 किमी लांबीचा हा बोगदा अप आणि डाऊन ट्रॅकसाठी असलेल्या दोन ट्रॅकला सामावून घेणारा सिंगल ट्यूब बोगदा असेल. हा बोगदा तयार करण्यासाठी 13.6 मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टनेल बोरिंग मशिनचा (टीबीएम) वापर करण्यात येणार आहे.

सामान्यत: एमआरटीएस - मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी 6-8 मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात, कारण हे बोगदे केवळ एका ट्रॅकला सामावून घेतात. बीकेसी, विक्रोळी आणि सावली येथे निर्माणाधीन तीन शाफ्टमुळे टीबीएमच्या माध्यमातून 16 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com