Pune : 500 हून अधिक कंत्राटी कामगार कसे बनले नेत्यांचे ‘घरगडी’? नवा घोटाळा उजेडात

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील (PMC) कंत्राटी झाडणकामगारांचा गैरवापर आणि शोषणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Pune
Pune : महापालिकेवर का आली 'त्या' टेंडर पुन्हा काढण्याची नामुष्की?

शहरातील रस्ते झाडण्याचे काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सुमारे ५०० हून अधिक कंत्राटी कर्मचारी प्रत्यक्षात झाडणकाम करत नाहीत, तर ते राजकीय नेते आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांमध्ये झाडणे, भाजी आणणे, माळीकाम, स्वयंपाकघरातील कामे यासारखी खासगी कामे करत आहेत. या कामगारांना या स्वरूपाची कामे करण्यास भाग पाडले जात आहे आणि नकार दिल्यास त्यांना नोकरीवरून हटवण्याची टांगती तलवार दाखवली जाते.

Pune
Pune : महापालिकेच्या 15 कोटींचा कोणी केला 'कचरा'?

या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे, हे सर्व कर्मचारी महापालिकेच्या झाडणकाम विभागात कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले जाते आणि त्यांना दर महिन्याला नियमित पगारही दिला जातो. या बनावट हजेरीमुळे शहरातील प्रत्यक्ष स्वच्छता व्यवस्था ढासळली आहे.

महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एकूण १० हजार २२० झाडणकामगारांपैकी फक्त ५ हजार ४०६ कर्मचारीच प्रत्यक्ष झाडणकाम करत आहेत. उर्वरित ४ हजार ३२४ कर्मचारी इतर कामांमध्ये गुंतलेले आहेत. यामध्येच जवळपास ५०० कर्मचारी नेत्यांच्या घरांमध्ये खाजगी सेवक म्हणून वापरले जात असल्याची माहिती महापालिकेच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे.

झाडणकामासाठी कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या या कामगारांना कोणतेही सुरक्षा कवच नसल्यामुळे त्यांच्याकडून घरगडीसारखी कामे करून घेतली जातात. काही नेते आणि माजी लोकप्रतिनिधींच्या प्रभावामुळे प्रशासकीय अधिकारीही याकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य निरीक्षक आणि मुकादम या पदांवरील काही व्यक्ती कामाच्या बदल्यात पैसे घेऊन या झाडणकामगारांची नेमणूक थेट राजकीय पुढाऱ्यांच्या घरी करत असल्याचे आरोप झाले आहेत.

या सगळ्याचा थेट परिणाम शहरातील स्वच्छतेवर होत असून, अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे, वेळेत न होणारे झाडणकाम आणि अस्वच्छता वाढली आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांकडून राजकीय दबावापोटी मौन बाळगले जात आहे.

विशेष म्हणजे काही अधिकारी स्वतःच्या घरीही या कामगारांना वैयक्तिक सेवक म्हणून वापरत असल्याच्या तक्रारी आहेत. कामगारांची संख्या रस्त्यांवर कमी असल्याने शहराची स्वच्छता व्यवस्था ढासळली असून, याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत.

Pune
Pune : एक निर्णय अन् पालिकेचे असे वाचले तब्बल 35 कोटी

झाडणकामासाठी नियुक्त झालेल्या एका कर्मचाऱ्याचा अनुभव सांगतो की, एका माजी नगरसेविकेच्या शिफारशीने त्याला कामावर घेतले गेले, पण त्याने त्यांच्या घरी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला कामावरून काढण्यात आले आणि नंतर अनेक प्रयत्न करूनही पुन्हा काम मिळाले नाही. अशा घटना अनेक क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत घडत असून, प्रशासनातील अधिकारी उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत.

महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत सध्या ५२८७ कायम कर्मचारी आणि ४९३३ कंत्राटी कर्मचारी झाडणकामासाठी कार्यरत आहेत. यापैकी केवळ ५४०६ कर्मचारी प्रत्यक्ष झाडणकाम करत असल्याचे समोर आले असून, इतर ४३२४ कर्मचारी हे अन्य विभागांमध्ये किंवा राजकीय व प्रशासकीय व्यक्तींच्या घरात काम करत आहेत. हे चित्र केवळ कामगारांचे शोषणच दर्शवत नाही, तर नागरिकांच्या कररुपी पैशांचा गैरवापर आणि शहराच्या स्वच्छतेची होणारी अवहेलना देखील अधोरेखित करते.

या गंभीर प्रकारावर तातडीने उपाययोजना न केल्यास पुणे शहरात स्वच्छ भारत अभियान, टेंडर साफसफाईचे नियोजन आणि महापालिकेचा विश्वासार्हता यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. तसेच, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क, सुरक्षितता आणि व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी स्वतंत्र चौकशी आणि कायदेशीर कारवाईची गरज आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com