PM Narendra Modi : अखेर ठरलं! मोदी पुन्हा पुण्यात येणार? 'या' प्रकल्पाचे उद्घाटन

Narendra Modi
Narendra ModiTendernama

पुणे (Pune) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे (Pune Airport New Terminal) उद्‍घाटन २ मार्चला होण्याची शक्यता आहे. मात्र, ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्‍घाटन करतील, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, या वृत्ताला पुणे विमानतळ प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही.

Narendra Modi
Nashik DPC : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी चांगली बातमी; तब्बल 1262 कोटींचा निधी...

टर्मिनलच्या उद्‍घाटनावरून गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू होते. राज्यसभेतही टर्मिनलच्या उद्‍घाटनावरून प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे प्रशासनही लवकर उद्‍घाटन व्हावे, याच भूमिकेत आहे.

Narendra Modi
MGNREGA : राज्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे 671 कोटी चार महिन्यांपासून थकले

नव्या टर्मिनलवर प्रवाशांना मिळणार या सुविधा...

- प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर

- प्रवाशांच्या बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही, तसेच या प्रणालीमुळे एक्स रे मशिनमधून बॅग बेल्टवर घेऊन जावे लागणार नाही. हे काम नवीन मशिन करेल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत बचत होईल

- प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज यात एक कमर्शिअल लाउंजचादेखील समावेश आहे

- कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर

- लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

- रेस्टॉरंट

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com