Pimpri : ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी महापालिकेकडून तीन वेळा टेंडर पण कंपनीकडून टाळाटाळ

Charging Station
Charging StationTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : ई-वाहनांचे ‘चार्जिंग पॉइंट’ उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करते आहे. त्यानुसार टेंडर काढून दिल्ली येथील ‘जिवा इंटरनॅशनल’ कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र, सुविधा उभारण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत नसल्याची स्थिती आहे.

Charging Station
Mumbai Metro-3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ॲक्वा लाईन प्रवासासाठी सज्ज

ई-वाहनांचे चार्जिंग पॉइंट उभारण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पहिले टेंडर काढले. भविष्यात नागरिकांकडून ईलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल की नाही, या भीतीपोटी कंपन्यांनी जोखीम टाळली. त्यामुळे टेंडरला अल्प प्रतिसाद मिळाला. आठ महिन्यानंतर दुसरी, तर पाच महिन्यांत तिसरी टेंडर काढण्यात आले. त्यानुसार दिल्ली येथील जिवा इंटरनॅशनल कंपनीने नियम व अटींची पूर्तता करून ही टेंडर मिळविले. पुढे लेखापरीक्षण तसेच इतर कारणांमुळे ही प्रक्रिया खोळंबली होती. त्यानंतरही सर्व प्रक्रिया पार पडल्यावर चार्जिंग पॉइंटचे काम सुरू न केल्याने महापालिकेने दोनवेळा टेंडर धारकास नोटीस पाठविल्या आहेत. तरीदेखील जुमानत नसल्याचे पाहून अखेर त्याला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस पाठविण्यात आली. या भीतीपोटी संबंधित कंपनीने काम करण्यास मान्यता दिल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Charging Station
Pune : सरकारच्या सांगण्यावरून महापालिकेला 'या' कामासाठी मोजावे लागणार 95 कोटी

प्रस्तावित चार्जिंग पॉईंट

ऑटो क्लस्टर, दुर्गा टेकडी, ट्रान्सपोर्टनगर परिसर, चिखली आरटीओ, बर्ड व्हॅली, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल, भोसरी-लांडेवाडी, भक्ति-शक्ति, बजाज ऑटो, एचए कंपनी परिसर, संत तुकारामनगर, कासारवाडी, कोकणे चौक, राजर्षि शाहू गार्डन परिसर, सावित्रीबाई फुले उद्यान आदी ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जातील.

टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, संबंधित कंपनीने काम करण्यास उशीर केल्याने शहरात चार्जिंग पॉइंट उभारण्यास विलंब झाला आहे. यामुळे त्यास काळ्या यादीत टाकण्याची नोटीस पाठविल्यानंतर कंपनीने कामाला सुरूवात करण्याचे मंजूर केले आहे. काही कालावधीत शहरात पॉइंट सुरू होतील.

- बाळू लांडे, उप अभियंता, पिं. चिं. महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com