PCMC : चिंचवड स्टेशन येथील 'तो' पूल पाडणार; कारण...

Indian Railway
Indian RailwayTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : चिंचवड स्टेशन येथे लोहमार्गावर नवीन पूल उभारणे, तळवडेतील सहयोगनगर येथे वाहतुकीस अडथळा ठरणारा अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचा खांब (टॉवर) हटविण्यासह विविध विषयांना महापालिका स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेने मंगळवारी मंजुरी दिली. टॉवरच्या जागी मोनोपोल उभारण्यात येणार आहे.

Indian Railway
Pune Airport : लोहगाव विमानतळ होणार बंद; मग...

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात सर्वसाधारण आणि स्थायी समिती सभा झाली. त्यांची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील जुना पूल पाडून नवीन उभारण्यात येणार आहे. तसेच, तळवडेतील सहयोगनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये ४० वर्षांपासून असलेला टॉवर हटविण्यास आणि त्या जागेवर मोनोपोल उभारण्यास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.

Indian Railway
Pune : स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गात बदल; काय आहे नवा प्लॅन?

महापारेषणचे महापालिकेस पत्र

सहयोगनगर ते त्रिवेणीनगर मार्गावरील उच्चदाब वीजवाहिनीचा खांब (टॉवर) हटवावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे प्रभाग क्रमांक १२ मध्ये सहयोगनगर आहे.

येथे वाहतुकीच्या रस्त्यामध्ये महापारेषणाचा अतिउच्च दाबाचा २२० केव्ही क्षमतेच्या वीज वाहिनीचा टॉवर सुमारे ४० वर्षांपासून आहे. तळवडेत औद्योगिक वसाहत व आयटी पार्क असल्यामुळे लोकवस्ती व वाहतूक कोंडी नेहमीच होते. शिवाय, सध्याच्या टॉवरखालून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरू आहे.

Indian Railway
Mumbai : मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार मोठी भेट! BMC ने काय केली घोषणा?

याबाबत महापारेषणने हा रस्ता बंद करण्याबाबत वारंवार कळविले आहे. परंतु, हा रस्ता वाहतुकीचा असून तांत्रिक कारणांमुळे बंद करणे शक्य नसल्याचे स्थापत्य विभागाने कळविले आहे.

हा मनोरा स्थलांतर करून रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहतूक सुरळीत करण्याकरिता सद्यःस्थितीत असलेला मनोरा ५० मीटर पुढे किंवा मागे घेऊन मोनोपोलद्वारे वीजप्रवाह सुरळीत करावा. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहतुकीस जागा उपलब्ध करण्याचा पर्याय समोर आला होता. हा मोनोपोल कमी जागेत उभारण्यात येणार असल्याने सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार असून परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com