CETP : भोसरीत उभा राहतोय 'हा' प्रकल्प; 60 वर्षांचा प्रश्न सुटणार

CEPT
CEPTTendernama

पुणे (Pune) : मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने (एमसीसीआयए) पुढाकार घेतला असून भोसरी एमआयडीसीत सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या साठ वर्षांपासून भेडसावणारा औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे. त्याचे भूमीपूजन बुधवारी झाले. या प्रकल्पाचा फायदा शहरातील छोट्या-मोठ्या सुमारे तीनशे कंपन्यांना होणार आहे. प्रकल्पाचा सर्वंकष कृती आराखडा (DPR) करण्यासाठी विशेष उद्देश वहन (SPV) कंपनी अर्थात पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशनची स्थापना केली आहे.

CEPT
Nitin Gadkari : देशात पहिली ब्रॉडगेज मेट्रो या शहरांदरम्यान धावणार

पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्टा हा देशातील एक प्रमुख उत्पादन केंद्र आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड, चिखली, तळवडे, आकुर्डी, निगडी, मोरवाडी, कासारवाडी औद्योगिक परिसरात सुमारे चार हजारांहून अधिक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्यासाठी सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याची मागणी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर सातत्याने करत होती. त्यास आता मुहूर्त मिळाला आहे.

महापालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (पीसीएमसी सीईटीपी) फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या विशेष सहकार्याने भोसरीत सामाईक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात येणार आहे.

त्याचे भूमिपूजन महापालिका पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, सहाय्यक प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम. एस. कलकूटकी, एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने, पुणे मेटल फिनिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बनवट, पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव शहा, महापालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्यासह स्थानिक उद्योग संघटनांचे अधिकारी उपस्थित होते.

CEPT
Aurangabad: 'या' रस्त्याने का घातली औरंगाबादकरांना भुरळ?

...अशी असेल रचना

औद्योगिक परिसराची भौगोलिक स्थिती एकसारखी नाही. उंच-सखलपणा आहे. त्यामुळे भूमिगत वाहिन्यांद्वारे सर्व कंपन्यांमधील सांडपाणी आणणे शक्य होणार नाही. त्यासाठी औद्योगिक कंपन्यांमधून टँकरमध्ये सांडपाणी संकलित करून प्रकल्पापर्यंत आणले जाईल. तिथे प्रक्रिया झाल्यानंतर निघालेल्या स्वच्छ पाण्याचा पुनर्वापर केला जाईल. ते पाणी पुन्हा कंपन्यांना पुरविले जाईल.

मराठा चेंबरचे सहकार्य
- सांडपाणी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सीइटीपीचे सदस्य होणे बंधनकारण असेल
- सीईटीपी स्थापन करण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महत्त्वाचे व रचनात्मक सहाय्य
- प्रत्येक सहभागी कंपनीकडून प्रत्येकी एक लाख रुपये निधी उभा करणार
- दीड वर्षात प्रकल्प उभारून कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

CEPT
Aurangabad: हर्सूल रस्ता रुंदीकरणात खोडा; कोणी केली कोंडी?

प्रकल्पाचा परिणाम
- प्रकल्पामुळे कंपन्यांतील सांडपाण्यावर प्रक्रिया होणार
- प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पूनर्वापर होणार
- जमीन व नदीचे प्रदूषण कमी होणार
- उद्योगांसह नागरिकांनाही फायदा होणार

वस्तुस्थिती
- सुमारे एक हजार कंपन्यांमधून रासायनिक घातक सांडपाणी व कचरा निर्माण होतो
- कंपन्यांतीन रसायनिक सांडपाणी व कचऱ्याची शास्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची सुविधा नसल्याने जमीन व जलप्रदूषण
- प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळनकडून ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ श्रेणीतील औद्योगिक युनिट्सचा संमती डेटा प्रदान

प्रकल्पाची आर्थिक बाजू (एकूण खर्चाच्या प्रमाणात टक्के वाटा)
महापालिका ः ६५ टक्के
एमआयडीसी व ः २० टक्के
एमपीसीबी ः ५ टक्के
उद्योजक ः १० टक्के

असा असेल प्रकल्प
भूक्षेत्र ः सुमारे दीड एकर
कुठे ः प्लॉट क्र. टी-१८८/१, एमआयडीसी, भोसरी
कशी ः नाममात्र दराने जागा उपलब्ध
क्षमता ः १ एमएलडी

CEPT
Aurangabad: नियोजनशून्य कारभार; 16व्या दिवशीच खोदला नवा कोरा रस्ता

प्रकल्पाचा सर्वंकष कृती आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. तो लवकरच पूर्ण होईल. सध्या सांडपाणी निर्मितीचे प्रमाण लक्षात घेता सुमारे एक दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रकल्पाच्या अंतिम क्षमतेचा निर्णय घेण्यात येईल.
- संजीव शहा, अध्यक्ष, पीसीएमसी सीईटीपी फाउंडेशन

गेल्या वर्षी महापालिका, एमआयडीसी, एमपीसीबी, उद्योग संघटनांची बैठक झाली होती. त्यात एमआयडीसीत कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, एमआयडीसीकडून सुमारे दीड एकरचा भूखंड नाममात्र दराने उपलब्ध झाला आहे. त्यावर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
- दीपक करंदीकर, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com