Pune : येरवडा ते कात्रज बोगद्याची घोषणा झाली पण 'या' मार्गावरील बोगदा अद्याप कागदावरच

PMC
PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : पुण्यात येरवडा ते कात्रज असा बोगदा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. सुमारे साडेसात हजार कोटी रुपये खर्च करून बांधला जाणार हा बोगदा कसा असणार याची उत्सुकता लागली आहे. मात्र, दुसरीकडे कोथरूड, पाषाण, बाणेर, सेनापती बापट रस्ता परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने विकास आराखड्यात सुतारदरा ते पाषाण आणि सेनापती बापट रस्ता ते पाषाण असा बोगदा प्रस्तावित केला आहे. त्याचा प्रारूप व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) महापालिकेला प्राप्त झाला असला, तरी विरोध करणाऱ्या नागरिकांची समजूत घालून पर्यायी जागा महापालिकेला निश्‍चित करता आलेली नाही. त्यामुळे या बोगदा केवळ कागदावरच आहे.

PMC
Mumbai : बदलापूर ते कर्जत रेल्वे मार्गावर 10 उड्डाणपूल उभारणार

शहरीकरणाचा वेग आणि खासगी वाहनांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहराची लोकसंख्या जेवढी आहे, तेवढीच वाहनांची संख्या आहे. या वाहनांसाठी महापालिकेकडून मुख्य शहरासह उपनगरांमध्ये उड्डाण पूल, समतल विलगक बांधणे, नवीन रस्ते विकसित केले जातात. मात्र, वाढत्या वाहनांच्या तुलनेत रस्त्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने रस्ते कमी पडत आहेत. त्यामुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अनुभवण्यास येते. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे विकास आराखड्यातील अर्धवट रस्ते किंवा एकमेकांना समांतर असणारे रस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन रस्ते, उड्डाणपूल सुचविण्यात येतात. पण अर्थसंकल्पातील अनेक प्रकल्प कागदावरच राहतात.

PMC
Pune-Nashik Road : नाशिक फाटा ते खेडपर्यंत रुंदीकरण आणि एलिव्हेटेडला कधी मिळेल मुहूर्त?

अंतिम अहवालाची प्रतीक्षा

कोथरूडवरून थेट पाषाण आणि सेनापती बापट रस्त्यावरून पाषाणकडे जाण्यासाठी टेकडीमुळे मोठा वळसा घालून जावा लागतो. पण हा भाग बोगद्यातून जोडल्यास अंतरही कमी होईल आणि वाहतूक कोंडीतून मार्ग निघू शकतो. त्यामुळे हा बोगदा विकास आराखड्यात प्रस्तावित आहेत. या टेकडीच्या खालून बोगदा करणे शक्य आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने मोनार्क या संस्थेला काम दिले होते. या संस्थेने महापालिकेकडे प्रारूप अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये या ठिकाणचा खडक हा भक्कम असल्याने बोगदा करणे शक्य असल्याचा अहवाल महापालिकेला दिला. त्यात महापालिकेने काही बदल सुचविले आहेत. पण अजून अंतिम व्यवहार्यता अहवाल महापालिकेला मिळालेला नाही.

असा असेल प्रकल्प

१) कोथरूड येथील बोगदा सुतारदरा येथे सुरू होऊन तो पाषाण येथील पंचवटी परिसरात संपणार

२) रस्त्याची एकूण लांबी १.५७ किलोमीटर

३) बोगद्याचा भाग ९५० मीटर

४) सेनापती बापट रस्ता ते पंचवटी रस्त्याची लांबी ८०० मीटर

५) त्यातील बोगद्याचा भाग ५५० मीटर

६) अंतिम अहवालात ठिकाण बदलल्यास लांबीमध्ये काही प्रमाणात फरक पडू शकतो

७) प्रकल्पासाठी सुमारे ३१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

PMC
Pune : पुणे मेट्रोला जे जमले नाही ते ‘आयटीयन्स’नी करून दाखविले

पाषाणमधील बोगद्याची जागा बदलणार

सुतारदरा येथून बोगदा करण्यासाठी योग्य जागा आहे, तर सेनापती बापट रस्ता येथे सध्या प्रस्तावित रस्ता हा दाट लोकवस्तीच्या भागातील आहे. त्यामुळे तेथे मोठा रस्ता करणे शक्य नसल्याने अन्य पर्याय विचारात घेतला जात आहे. तर पाषाण येथे दोन्ही बोगदे एका ठिकाणी एकत्र येतात. येथे पंचवटी भागातील काही अधिकाऱ्यांच्या सोसायट्यांना त्याचा अडथळा निर्माण होत असल्याने त्यांनी बोगद्याला विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे नवीन ठिकाणाचा शोध सुरू केला आहे.

कोथरूड, सेनापती बापट रस्ता, पौड रस्ता, गणेशखिंड रस्ता यासह अन्य भागांतील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी हे दोन्ही बोगदे आवश्‍यक आहेत. यात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. पंचवटी येथे काही नागरिकांनी बोगद्याच्या ठिकाणास विरोध केला आहे. महापालिकेने नवीन जागा शोधली असून पुढील आठवड्यात अंतिम व्यवहार्यता अहवाल सादर होईल.

- युवराज देशमुख, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग

पुढील प्रक्रिया अशी असेल

- अंतिम व्यवहार्यता अहवाल सादर होणार

- बोगद्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती

- आराखडा तयार करण्यास किमान सहा ते १२ महिन्यांचा कालावधी

- प्रकल्प आराखडा आल्यानंतर निविदा काढून ठेकेदार निवडणार

- स्‍थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com