Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा 'तो' दौरा पुणे महापालिकेला पडला 1 कोटी 85 लाखांना

Narendra Modi
Narendra ModiTendernama

पुणे (Pune) : महापालिकेच्या प्रकल्पाचे उद्‍घाटन, मेट्रो मार्गाचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) १ ऑगस्ट २०२३ रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्या वेळच्या मंडप व बैठक व्यवस्थेसाठी १ कोटी ८५ लाख १ हजार ४६९ रुपयांचा खर्च झाला होता. तो महापालिकेच्या तिजोरीतून जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

Narendra Modi
सरकारी पदे कंत्राटी तर आमदार, खासदारही कंत्राटी का नाही?; कोणी केला सवाल?

पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा कार्यक्रम स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तेथे पुणे महापालिका, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रो यांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्‍घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंडप व ७ हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या या दोन्ही कार्यक्रमांचा खर्च पुणे महापालिकेवर टाकण्यात आला आहे. या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासक विक्रम कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

Narendra Modi
Tanaji Sawant : मंत्री डॉ. तानाजी सावंतांची पाचही बोटे तुपात! काय आहे कारण?

अशी आहेत बिले (रुपयांत)

ठेकेदार- रक्कम

- मे. मेराकी इव्हेंट्स- १ कोटी २४ लाख ९२ हजार

- बालाजी मंडप डेकोरेटर्स- ४९ लाख ८ हजार

- सागर येनपुरे - २ लाख ११ हजार

- कमलेश जडे - ८ लाख ८८ हजार

जर्मन हँगर पद्धतीचा मंडप

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम ऐन पावसाळ्यात असल्याने गैरसोय होऊ नये, यासाठी बंदिस्त जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच ‘जी-२०’परिषदेच्या कार्यक्रमाला मंडप टाकण्यासाठी जो ठेकेदार नियुक्त केला होता, त्यांच्याकडूनच ही कामे तातडीने करून घेण्यात आली आहेत, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com