Mumbai Pune Expressway: द्रुतगतीवरील प्रवास होणार अधिक सुरक्षित; लॉजिस्टिक्स हबमुळे...

Mumbai Pune Expressway (File)
Mumbai Pune Expressway (File)Tendernama
Published on

पुणे (Pune): पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने अवजड वाहनचालकांच्या सोयीसाठी ट्रक टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Pune Expressway (File)
'दस का दम'! मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील वाहतूक कोंडीवर 'दहा'चा उपाय

खालापूर टोलनाक्याजवळील ताजे या भागात ट्रक टर्मिनल तयार केले जाणार असून, त्याची क्षमता ५०० ट्रकची असणार आहे. हे केवळ ट्रकचे पार्किंग नसून, येथे चालकांसाठी आधुनिक सोयी सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावरची मार्गिका वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याला अंतिम मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होईल. हे काम करीत असतानाच ताजेजवळ ट्रक टर्मिनल बांधण्यात येणार आहे. यामुळे अवजड वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे.

Mumbai Pune Expressway (File)
Bullet Train: बुलेट ट्रेनचा महत्त्वाचा दुसरा टप्पाही फत्ते!

चालकांसाठी या सुविधा
- चालकांसाठी जेवण व आरामाची सोय.
- ट्रकमध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्तीसाठी मेकॅनिक आणि गॅरेजची सुविधा.
-संपूर्ण टर्मिनल सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली असेल.
- चालकांसाठी प्रसाधनगृहे आणि जवळच इंधनाची सोय.

वाहतूक कोंडीतून सुटका
लोणावळा घाट परिसरात किंवा बोरघाटात अनेकदा ट्रक बंद पडल्याने किंवा रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीर पार्किंग केल्याने वाहतूक कोंडी होते. या टर्मिनलमुळे महामार्गावरील अवैध पार्किंगला आळा बसेल. अवजड वाहने या टर्मिनलमध्ये थांबवल्याने मुख्य मार्गावर इतर हलक्या वाहनांना विनाअडथळा प्रवास करता येईल.

Mumbai Pune Expressway (File)
नव्या एक्सप्रेस-वेमुळे मुंबई - पुणे प्रवास करा फक्त 90 मिनिटांत

अपघातांचे प्रमाण घटणार
रात्रीच्या वेळी महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसून होणारे अपघात ही मोठी समस्या आहे. टर्मिनल सुरू झाल्यानंतर ट्रकचे पार्किंग तर होईलच शिवाय चालकांची विश्रांतीची सोय होईल. तसेच बेकायदेशीर पार्किंगला आळा बसेल. परिणामी अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Mumbai Pune Expressway (File)
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील कोंडी फोडणाऱ्या मिसिंग लिंकचा मुहूर्त पुन्हा चुकला; नेमकं काय झालं?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची वाहतूक वाढली आहे. ताजे येथे ट्रक टर्मिनल होणार आहे. हे केवळ पार्किंग नसून एक ‘लॉजिस्टिक्स हब’ असेल. ट्रक चालकांना तिथे विश्रांती, जेवण आणि दुरुस्तीच्या सोयी मिळतील. यामुळे चालकांचा थकवा कमी होऊन, मानवी चुकीमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होईल. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल.
- राहुल वसईकर, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com