मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील कोंडी फोडणाऱ्या मिसिंग लिंकचा मुहूर्त पुन्हा चुकला; नेमकं काय झालं?

Mumbai Pune Expressway Missing Link Project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती ऑक्टोबर-नोव्हेंबरची डेडलाईन; 'तुफान' पावसाचा केबल स्टे ब्रीजच्या कामाला फटका
Missing Link
Missing LinkTendernama
Published on

मुंबई (Mumbai Pune Expressway Missing Link Project): मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) उभारित असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला धुव्वाधार पावसामुळे 'लेटमार्क' लागला आहे.

Missing Link
Sambhajinagar : संरक्षित गौताळा औट्रम घाट अभयारण्यात बेकायदा जलमिशन योजनेचा घाट

डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

खोपोली ते कुसगाव दरम्यानचा हा १३.५ किलोमीटर लांबीचा 'मिसिंग लिंक' प्रकल्प एक्सप्रेस वेवरील घाट सेक्शनमधील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. विशेषतः दोन बोगदे आणि आव्हानात्मक केबल स्टे ब्रीज हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

सुरवातीला डिसेंबर २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये प्रकल्पाची पाहणी करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गेली पाच महिने पडलेल्या जोरदार पावसामुळे कामाच्या वेगावर मोठा परिणाम झाला.

Missing Link
Beed Bypass Road : 400 कोटी खर्चूनही 'या' महामार्गाच्या दर्जाला का गेला 'तडा'?

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनीही ही बाब मान्य केली आहे. पावसामुळे केबल स्टे ब्रीजच्या कामावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. मात्र, आता पाऊस थांबल्यापासून कामाला पुन्हा वेग आला आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असले तरी, अत्यंत कठीण भूभागातून आणि जोरदार वाऱ्याच्या (१८० किमी वेगाने वारा) दरीत उभारले जात असलेले केबल स्टे ब्रीजचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. १८२ मीटर उंच असलेल्या अंदाजे ६०० मीटर लांबीच्या दुसऱ्या वायडक्ट ठिकाणी हा पूल उभा राहत आहे.

या पुलाचा पाया तब्बल २८ मीटर खोल असून तो पुलाला १०० किमी वेगाने वाहने चालवण्यासाठी आवश्यक असलेली मजबुती देईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पूर्णत्वास होणाऱ्या विलंबाने मुंबई-पुणे प्रवाशांना एक्स्प्रेस वेवरील सुधारित प्रवासाच्या अनुभवासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com