uday samant
uday samanttendernama

Pune : वडगाव शेरीत पुरापासून संरक्षणासाठी 250 कोटी मंजूर : उद्योगमंत्री उदय सामंत

Published on

मुंबई (Mumbai) : वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी ७० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यातून या भागात पुरापासून संरक्षण विषयक पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत दिली.

uday samant
Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सहा आयटीआयचे होणार आधुनिकीकरण; 120 कोटींचे बजेट

सदस्य बापूसाहेब पठारे यांनी या संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी माहिती दिली. मुळा नदीच्या पुरामुळे येरवडा, विश्रांतवाडी, कळस भागात दरवर्षी गंभीर पूरस्थिती निर्माण होते, यावर कायमस्वरुपी प्रतिबंधात्मक योजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) अंतर्गत UFRMP प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही व पब्लिक अॅड्रेस सिस्टीम यंत्रणा अतर्भूत असलेले खांब नदीलगतच्या भागात बसविण्याचे नियोजन असून त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

uday samant
Pune: पुणेकरांचे 'ते' टेन्शन मिटले! आता बिनधास्त वापरा...

मंत्री सामंत यांनी सांगितले, यंदा खडकवासला धरणातून १६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग असतानाही या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासंबंधी देखील सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

Tendernama
www.tendernama.com