Pune: पुणेकरांचे 'ते' टेन्शन मिटले! आता बिनधास्त वापरा...

Pune City: मागील वर्षापेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
पुणे शहरातील पुलांची सुरू आहे तपासणी
Pune City Bridges NewsTendernama
Published on

पुणे (Pune): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये सध्या १८.३५ अब्ज घनफूट (TMC) पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६२.९५ टक्के इतके आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

पुणे शहरातील पुलांची सुरू आहे तपासणी
Pune: जमिनींच्या पोटहिश्श्यांबाबत 'भूमी अभिलेख'ने काय घेतला निर्णय?

खडकवासला प्रकल्पामध्ये गत वर्षापेक्षा १२.६९ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी या टप्प्यास केवळ ५.६६ टीएमसी इतकाच पाणीसाठा होता. पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी, धरणसाठ्यामध्ये नेहमीपेक्षा लवकर वाढ होण्यास सुरवात झाली. खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत खडकवासला धरणात चार मिलिमीटर, पानशेतमध्ये २७ मिलिमीटर, वरसगावमध्ये २४ आणि टेमघरमध्ये ८२ मिलिमीटर पाऊस झाला. मागील काही दिवसांपूर्वी धरणक्षेत्राबरोबरच घाटमाथ्यावर पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे जलसंपदा विभागाने खडकवासला प्रकल्पातून विसर्ग करण्यास सुरवात केली होती.

पुणे शहरातील पुलांची सुरू आहे तपासणी
Exclusive: राज्यातील कंत्राटदारांमध्ये का उडाली खळबळ? कोट्यवधींचे बनावट GR उजेडात

कळमोडी आणि नाझरे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला व्यतिरिक्त इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. चासकमान, वडज, विसापूर, पवना, गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड, येडगाव धरणांत ७२ टक्क्यांपेक्षा अधिक साठा जमा झाला आहे. मुळशीमधील टाटाच्या वेगवेगळ्या धरणांमध्ये ७२.८९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. भामा आसखेडमध्ये ५४.२५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

उजनीत ४३.८० टीएमसी पाणीसाठा
सोलापूरमधील उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, आतापर्यंत ८१.७५ टक्के धरण भरले आहे. खडकवासला धरणक्षेत्रात काही दिवसांपासून सलग कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे उजनी धरणातील पाणीपातळी वाढली. सध्या ४३.८० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे.

पुणे शहरातील पुलांची सुरू आहे तपासणी
Pune: 'त्या' पुलासाठी सक्तीने भूसंपादन करा!

धरण.......पाणीसाठा........टक्के
खडकवासला ः १.१९ ः ६०.२६
टेमघर ः १.९४ ः ५२.४५
वरसगाव ः ८.६५ ः ६७.४६
पानशेत ः ६.५७ ः ६१.६६
एकूण ः १८.३५ ः ६२.९५

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com