Housing Sector : पुणे, ठाणे, नाशिकने मुंबईला मागे टाकले? पाडव्याच्या दिवशी नेमके काय झाले?

Housing
HousingTendernama

पुणे (Pune) : गुढीपाडव्याचा मुहूर्त रियल इस्टेट क्षेत्रासाठी चांगली बातमी देणारा ठरला. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये नागरिकांनी नव्या घरांच्या खरेदीला प्राधान्य दिल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे १२ हजारांहून अधिक घरांचे बुकींग झाले.

Housing
Railway : बोरघाटात आता रेल्वेचा नवा प्रयोग; पुणे-मुंबई प्रवास होणार वेगवान

पाडव्याला मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यभरात सुमारे १२ हजाराहून अधिक घरांचे बुकिंग झाले असल्याचा नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचा (एनएआरईडीसीओ) दावा आहे. त्यामुळे बातमीमुळे हाऊसिंग क्षेत्राला चांगलाच बुस्ट मिळाला.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यभरात सुमारे १२ हजारहून अधिक घरांचे बुकिंग झाल्याचे समजते. दरम्यान सदरचे बुकिंग मुंबईच्या तुलनेत ठाणे, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात जास्त आहे. आज केवळ बुकिंग झाले असून त्याची नोंदणी येत्या महिनाभरात होणार आहे.

Housing
BMC : रस्त्यावरील खड्डा बुजविला की अवघ्या 2 तासांतच वाहतूक सुरू; काय आहे नवे तंत्रज्ञान?

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वसामान्यांकडून घर खरेदी, सोने खरेदीला पसंती दिली जाते. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या पत धोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृह कर्जाचा दर स्थिर असतानाच सोन्याने मात्र ७० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

Housing
Nashik : गौणखनिज विभागाला अंधारात ठेवून चांदवड तालुक्यात 3 महिन्यांपासून बेकायदा उत्खनन

त्यामुळे नागरिकांनी सोन्याऐवजी घर खरेदीला पसंती दिली असल्याचे नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे (एनएआरईडीसीओ) महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी सांगितले. एरव्ही दररोज होणाऱ्या घर खरेदीच्या तुलनेत आज पन्नास टक्क्यांहून अधिकच वाढ झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com