आता पुण्याहून मुंबईला पोहचा अवघ्या २५ मिनिटांत; कसे?

Pune City
Pune CityTendernama

पुणे (Pune) : पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवेसाठी (Pune To Mumbai Flights) पुणे विमानतळ (Pune Airport) प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विमानसेवा देणाऱ्या दोन कंपन्यांशी या संदर्भात चर्चा देखील झाली आहे. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) स्लॉट मिळणे अवघड असल्याने दिवसातून एक तरी सेवा सुरू होण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्न करीत आहे. ही विमानसेवा सुरू झाली तर पुण्याहून मुंबई अवघ्या २५ मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.

Pune City
नागपूर जिल्हा परिषदेतील दोन कोटींच्या फाईल कशासाठी रोखल्या?

पुणे-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी एअर इंडिया व इंडिगोसाठी विमानतळ प्रशासन चर्चा करीत आहे. शिवाय नागरी विमान वाहतूक संचलनालयाकडे (डीजीसीए) देखील यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. पुणे-मुंबई सेवा सुरू झाल्यास मुंबई गाठण्यासाठी रस्ते वाहतुकीची आवश्यकता भासणार. त्यामुळे वेळेत मोठी बचत होईल. शिवाय प्रवाशांना मुंबई विमानतळावरूनच आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणे सोपे होणार आहे.

Pune City
मुंबईतून नवी मुंबई अवघ्या 15 मिनिटांत; नोव्हेंबरचा मुहूर्तही ठरला

पंधरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये पुणे-मुंबई-दिल्ली अशी दररोज विमानसेवा सुरू होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेट एअरवेज पुणे ते मुंबई थेट विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, ती देखील सेवा काही कारणामुळे बंद झाली. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्याच्या केवळ गप्पा झाल्या. पुढे काही नाही. आता मात्र समर शेड्यूलमध्येच पुणे-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune City
मुंबईकरांनो घर घेण्यासाठी व्हा सज्ज!; म्हाडाची 3500 घरांसाठी लॉटरी

पुणे-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी ‘डीजीसीए’ला प्रस्ताव पाठविला आहे. विमानसेवा सुरू झाल्यावर प्रवाशांची मोठी सोय होईल. आम्ही या सेवेसाठी सकारात्मक आहोत.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ

पुणे-मुंबई सेवेला आधी देखील चांगली मागणी होती. आता विमानसेवा सुरू झाल्यास निश्चितच त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळेल. दिवसातून किमान तीनवेळा ही सेवा सुरू होणे गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

Pune City
लोकप्रतिनिधींच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे जलजीवनमध्ये नाशिक पिछाडीवर

पुणे-मुंबई विमानसेवेचा फायदा काय?
१. अवघ्या २५ मिनिटांत मुंबई गाठणे शक्य होणार असल्याने प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल
२. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहनाच्या संख्येत काही प्रमाणात तरी घट होईल
३. मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाने पुढचा प्रवास करणे सोपे जाईल
४. कार्गो सेवेला देखील चालना

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com