Charging Station In Pune : पुणे महापालिकेच्या चार्जिंग स्टेशनचा दर तुम्हाला माहिती आहे का?

Charging Station
Charging StationTendernama

पुणे (Pune) : पुणे शहरात (Pune City) ८२ ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन उभारण्याचा खासगी कंपनीचा प्रस्ताव महापालिकेने मान्य केला. पण त्यात चार्जिंगचा दर, महापालिकेच्या जागा वापराचे धोरण यात अस्पष्टता असल्याने पुणेकरांपेक्षा ठेकेदाराचेच हित होते. हा प्रकार समोर आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने नियम व अटींमध्ये स्पष्टता आणली आहे. चार्जिंगचे दर हे प्रतियुनिट २२ रुपयांवरून १३ ते १९ रुपये यादरम्यान राहणार असून, तोटा झाल्यास जागा काढून घेता येणार आहे.

Charging Station
पोलिसांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली गुड न्यूज?

शहरात ई-वाहनांची संख्या वाढत असल्याने चार्जिंग स्टेशनची सुविधा आवश्‍यक आहे. यासाठी महापालिकेने उद्यान, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृह, रुग्णालय, वाहनतळ येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी टेंडर काढली होती. या टेंडरमध्ये पात्र ठरलेल्या कंपनीला मोक्याच्या ८२ जागा आठ वर्षांसाठी वापरता येतील. त्यांना जो काही नफा होईल, त्यापैकी ५० टक्के हिस्सा महापालिकेचा असणार आहे.

चार्जिंगसाठी यंत्रसामग्री, मोबाईल ॲप्लिकेशन, वीजमीटर घेणे, त्याचे संपूर्ण बिल भरणे, एकूण चार्जिंग स्टेशनपैकी ९५ टक्के स्टेशन सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. महापालिकेकडे २५ लाख रुपये बँक गॅरंटी देणे यासह इतर अटी वर्क ऑर्डरमध्ये आहेत. पण जर चार्जिंग स्टेशन चालले नाही तर जागेचे काय करायचे? बाजारात कमी दरात चार्जिंग उपलब्ध होत असताना महापालिकेची जागा मोफत मिळूनही प्रतियुनिट २२ रुपये दर का? बँक गॅरेंटी जमा करण्यास विलंब का? असे प्रश्न उपस्थित होत होते.

('टेंडरनामा'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Charging Station
'आदित्य' राजाच्या कृपेने 'वरुण' राजाच्या टेंडरचा पाऊस; एकनाथ शिंदे यांचा घणाघात

अशी होती स्थिती

- चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी १६ मे २०२३ मध्ये वर्क ऑर्डर

- आठ दिवसांत कायदेशीर व कागदपत्रांची पूर्णता करणे

- चार महिने उलटूनही महापालिकेचा ठेकेदारासमवेत करार नाही

- ठेकेदाराने २५ लाख रुपयांची बँक गॅरेंटी भरलेली नव्हती

- चार्जिंगसाठी प्रतियुनिटचा दर २२ रुपये प्रस्तावित

- कायदेशीर व महापालिकेच्या दृष्टीने आवश्‍यक गोष्टींची पूर्तता न करता ठेकेदारासाठी जागांचा शोध सुरू

अशी आहे सद्यःस्थिती

- प्रत्येक चार्जिंग स्टेशनसाठी भाडे ठरविण्याचा अभिप्राय मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे प्रलंबित

- एका चार्जिंग स्टेशनमधून महसुलातील वाटा सलग सहा महिने ३५५९ रुपयांपेक्षा कमी असेल तर ती जागा महापालिका काढून घेणार

- सध्या ५३ ठिकाणी चार्जिंग स्टेशनची उभारणी शक्य

- ३१ डिसेंबरपर्यंत २१, तर ३१ जानेवारीपर्यंत ५३ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभी करणे आवश्‍यक

- वापरकर्त्यांकडून १३ ते १९ रुपये प्रतियुनिट पैसे घ्यावेत

- रस्ते खोदाईसाठी पथ विभागाकडून परवानगी आवश्‍यक

- २५ लाखांची बँक गॅरेंटी महापालिकेकडे जमा

Charging Station
Bacchu Kadu : दादा भुसे अन् झेडपीचा बच्चू कडूंनी रात्री पावणेबारालाच केला 'करेक्ट कार्यक्रम'!

महापालिका व ठेकेदार यांची नुकतीच बैठक झाली असून, यात पुणेकरांना जास्तीत जास्त फायदा होईल व महापालिकेच्या जागांचे रक्षण होईल, याप्रमाणे निर्णय घेतला आहे. ८२ चार्जिंग स्टेशनपैकी डिसेंबरअखेर २१, तर जानेवारी अखेरपर्यंत ५३ ठिकाणी स्टेशनची उभारणी केली जाईल. २५ लाखांची बँक गॅरेटी भरलेली आहे. यात नियमांचे पालन होणार याकडे लक्ष दिले जात आहे.

- श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com