चांदणी चौक : मुंबईकडून साताऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल संपेनात

chandani chowk
chandani chowkTendernama

पुणे (Pune) : चांदणी चौक (Chandni Chowk) आणि वाहतूक कोंडी असे समीकरणच बनले आहे. रविवारी एनडीए व बावधन अशा दोन्ही बाजूला खडक फोडण्यासाठी सुरुंगस्फोट करण्यात आले. वाहतूक सुरळीत होण्यास दीड-दोन तासाहून अधिक वेळ लागला. रविवार असूनही महामार्गावर मोठी गर्दी होती. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडली.

chandani chowk
कोयना प्रकल्पाची सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे; खर्चाचा बोजा वीज बिलातून

महामार्ग व त्याचे सेवारस्ते करण्यासाठी खडक फोडले जात आहेत. एनडीए बाजूचा ब्लास्ट दुपारी साडेबारा वाजता झाला. तो महामार्गाच्या आतील बाजूला होता. परिणामी त्याचा राडारोडा रस्त्यावर आला नाही. बावधन बाजूचा ब्लास्ट त्याचा राडारोडा रस्त्यावर पडला होता. सुरवातीला साताऱ्याहून मुंबई मुळशीची वाहतूक सोडली. ही वाहतूक मुळशीच्या रस्त्याने सोडली. पुन्हा महामार्गावर येता येते. या वाहतुकीला असा पर्याय आहे. परिणामी साताऱ्याहून मुंबई, मुळशी बाजूची वाहतूक कोंडी होत नाही. त्या रस्त्याने फक्त लहान वाहने सोडली जातात. त्यानंतर महामार्गावरून जड वाहने सोडली. परंतु मुंबईहून साताऱ्याकडे रस्त्याला पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी ही वाहतूक महामार्ग रिकामा झाल्याशिवाय सोडता येत नाही.

chandani chowk
नाशिक जिल्ह्यात लोकसहभागातून साडेचार हजार वनराई बंधारे

आठवड्यात काय झाले?

मागील आठवड्यात शनिवारी एक ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर पुलाचा कंट्रोल ब्लास्ट करून तोडला होता. त्याचा राडारोडा उचलून तो रविवारी दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता वाहतूक सुरू केली होती. सोमवारी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी परवानगी न घेता ब्लास्ट केला होता. त्याचा राडारोडा मोठा पडला. तो उचलण्याचे मोठे काम होते. वाहतूक पूर्ववत होण्यास चार-पाच तास वेळ लागला होता. त्यानंतर रात्रीच्या वेळी ब्लास्ट करण्याचे महामार्ग प्राधिकरणाने सूचना दिली होती.

chandani chowk
'ऑटोमोबाईल हब'ला हवा सेमी हायस्पीड रेल्वे सेवेचा बूस्टर डोस!

मोठा टप्पा पार

पूल पाडण्यापूर्वी दोन्ही बाजूच्या फक्त दोन-दोन लेन होत्या. आता साताऱ्याहून मुंबईला जाताना महामार्गाच्या अडीच व मुळशी मार्गे दोन अशा साडेचार लेन आहेत. मुंबई व मुळशीकडून सातारा मार्गावर फक्त अडीच लेन झाल्या आहेत. सहा पदरी महामार्ग व सेवा रस्त्यासाठी आणखी जागेची गरज आहे. परिणामी खडक फोडून तो रस्त्या केला जात आहे. लेन वाढल्याने वाहतुकीचा वेग वाढला आहे. रविवारी वाहतूक कमी असते म्हणून आजच्या ब्लास्टची परवानगी दिली होती. परंतु वाहतूक पोलिसांच्या मते नेहमीच्या रविवारपेक्षा आज जास्त वाहतूक महामार्गावर आली होती, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.

chandani chowk
नागपूर रेल्वे स्थानकाचे टेंडर अंतिम टप्प्यात; ३५० कोटींच्या कामाला

दोन्ही ब्लास्ट पावणेएक वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सुरवातीला सातारा-मुंबई मार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याने सुरू केली. सातारा-मुंबई मार्गावरील जास्त राडारोडा नसल्याने महामार्गावरील १५ मिनिटांत वाहतूक सुरू केली. त्यानंतर मुंबई-सातारा मार्गावरील वाहतूक सुरू केली. जड वाहतूक उशिरा सुरू केली.

- विशाल पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

chandani chowk
भुजबळांच्या अपूर्ण मांजरपाडा प्रकल्पास लवकरच..; फडणवीसांचे आश्वासन

काम कधी संपणार?

मुंबईहून साताऱ्याकडे जाणारी लहान व मध्यम प्रकारची वाहने ब्लास्टनंतर एक तासाने म्हणजे दीड वाजता सोडली. त्यानंतर जड वाहने दुपारी अडीच वाजता सोडली. अशा प्रकारे रस्ता बंद ठेवणार असल्यास त्याची माहिती अगोदर द्यावी. आता हे काम कधी संपणार असा प्रश्न या परिसरात राहणाऱ्या तितिक्षा नगरकर यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com