PMRDA: चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काय दिला आदेश?

Chakan Traffic: वाढत्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक, नागरिक हैराण
pmrda
pmrdaTendernama
Published on

पुणे (Pune): चाकणसह परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी या भागातील अतिक्रमणांचा सर्व्हे करण्यात येत असून, संबंधितांनी अनधिकृत बांधकामे अथवा अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिला आहे.

pmrda
CIDCO Tender: मुंबई जवळच्या 'त्या' बेटाचा विकास करणार; सिडकोने टेंडरही काढले

वाढत्या अतिक्रमणामुळे चाकण एमआयडीसीसह परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या भागातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागेवर मार्किंग करण्यात येणार आहे.

आगामी आठवडाभरात संबंधित अनधिकृत बांधकामे, तसेच अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

pmrda
PMC: पुण्यातील 'ती' जागा महामेट्रोला मिळणार

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समांतर रस्त्यांचे जाळे विकसित करण्याच्या अनुषंगाने भर देण्यात येत आहे. काही रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्याच्या अनुषंगाने नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत आहे.

पुणे-नाशिक रस्ता, तळेगाव-चाकण शिक्रापूर रस्ता, नगरपालिका क्षेत्र व नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या परिसरातील अस्तित्वातील नाले बुजविण्यात आले आहे, ते संबंधितांनी खुले करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

pmrda
नांदेड विमानतळाच्या धावपट्टीवर खड्डे! विमानसेवा बंद

संबंधितांवर गुन्हा नोंदवणार

चाकण भागातील अतिक्रमणांचा सर्व्हे करण्यात येणार असून, संबंधित अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली अतिक्रमणे जर संबंधितांनी पुन्हा केली, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com