भामा आसखेड जॅकवेलची Tenderप्रक्रिया रद्द करण्याची कोणी केली मागणी?

Bhama Askhed Dam Jackwell
Bhama Askhed Dam JackwellTendernama

पुणे (Pune) : भामा आसखेड धरणातून पाणी उचलताना बांधावयाच्या जॅकवेलसाठी गोंडवाना इंजिनिअरिंग कंपनीचे टेंडर (Tender) महापालिकेने (PCMC) मंजूर केले आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आक्षेप घेतला आहे. संबंधित कंपनी काळ्या यादीत आहे. मात्र, ही माहिती त्यांच्याकडून लपवण्यात आली. त्यामुळे टेंडर प्रक्रिया राबवू नये, तसेच कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करीत, आयुक्तांनी या टेंडरला मंजुरी दिल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

Bhama Askhed Dam Jackwell
Sambhajinagar : सरकारच्या चौकशीत यंत्रणा दोषी पण मंत्रालय पाठीशी

याबाबत शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धिपत्रक काढले आहे. याबाबत आपण न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या दालनासमोर गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाच्या दिवशीच, हे टेंडर मंजूर करून, असंवेदनशीलता दाखवली, असेही राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.

Bhama Askhed Dam Jackwell
Nashik : 461 गावांपैकी केवळ 24 गावांसाठी स्मशानभूमीशेड मंजूर

ज्यावेळी टेंडर काढले, तेव्हा ठेकेदार कंपनी काळ्या यादीत नव्हती. कोणताही ठेकेदार कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकला जात नसतो. ‘राष्ट्रवादी’सह अन्य आरोपांचाही आम्ही विचार केला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला आहे. शहरातील पिण्याचा पाण्याची समस्या लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे. राजकीय दबावाच्या आरोपाबाबत मला काही बोलायचे नाही.
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com