Pimpri : पिंपरीतील नागरिकांनी मार्चअखेर भरला तब्बल 'एवढा' कर

PCMC
PCMCTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : मिळकतकर वसुलीच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थात ३१ मार्चला रात्री ११ वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी तब्बल ९६४ कोटी ५० लाख रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १६ कोटी ७१ लाख रुपये जादा भरणा झाले आहेत.

PCMC
Pune : पुणे कोलकता विमान प्रवास महागला; कारण काय?

आर्थिक वर्ष २०२४-२५ सोमवारी (ता. ३१ मार्च) संपले. नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ मंगळवारपासून (ता. १ एप्रिल) सुरू होणार आहे. चालू आर्थिक वर्षासह २०२३-२४ या मागील वर्षाचा मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रकारे प्रयत्न केले. थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केली. मिळकती ‘सील’ करून जप्त केल्या. काहींचा लिलाव केला असून, काहींची प्रक्रिया सुरू आहे. करभरणा करावा, यासाठी ध्वनिक्षेपके, मोबाईलद्वारे संपर्क साधून, जाहिराती करून आवाहन केले. ‘एसएमएम’द्वारे थकबाकीदारांना कळविले. अनेकांचे नळजोड खंडित केले. तरीही बहुतांश जणांनी करभरणा केलेला नाही. त्यांच्या सोयीसाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी (ता. ३१) रात्री बारा वाजेपर्यंत करसंकलन विभागाची सर्व १८ विभागीय कार्यालये खुली ठेवली होती. शिवाय ऑनलाइन करभरणा सुविधाही उपलब्ध होती. त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले.

PCMC
Mumbai Pune Expressway वरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! मिसिंग लिंकच्या टोलबाबत आली महत्त्वाची बातमी

दृष्टिक्षेपात पिंपरी-चिंचवड

एकूण मालमत्ता : ६ लाख ५५ हजार

जप्त केलेल्या मिळकती : १,०६९

नळजोड तोडणी : १,०२०

लिलाव प्रक्रियेतील मिळकती : ४३४

२०२३-२४ उपयोगकर्ता शुल्क वसुली : ४६ लाख ९८ हजार

आर्थिक वर्ष-प्राप्त झालेला मिळकतकर

२०२३-२४ : ९७७ कोटी २५ लाख

२०२४-२५ : ९६४ कोटी ५० लाख (३१ मार्च रात्री ११ वाजेपर्यंत)

कर भरणाऱ्यांना गुलाबाचे फुल

महापालिका करसंकलन विभागाची शहरातील सर्व १८ विभागीय कार्यालये सोमवारी (ता. ३१) रात्री १२ वाजेपर्यंत खुली होती. या दिवशी कर भरण्यासाठी आलेल्यांचे संबंधित कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन विभागाने शहरातील १८ विभागीय करसंकलन कार्यालये व कॅश काउंटर्स सोमवारी (ता. ३१) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवली होती. आता कर न भरणारे ‘डिफॉल्टर लिस्ट’मध्ये जातील. त्यांच्यावर कारवाई सुरूच राहणार आहे.

- अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, महापालिका

महापालिकेने कर थकबाकी वसुली मोहीम राबविली आहे. आतापर्यंत एक हजार ६९ पेक्षा अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. जवळपास एक हजार २० पेक्षा अधिक नळजोड खंडित केले आहेत. ही कारवाई सुरूच राहणार असून, थकबाकीदारांनी करभरणा तत्काळ करावा.

- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com