वाहतूक कोंडीत अडकलेल्या सिंहगड रोडवासियांच्या मदतीला धावले अजितदादा; नेमकं झालयं काय?

Traffic
TrafficTendernama
Published on

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील (Sinhgad Road Bridge) उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्या (१ मे) उद्‍घाटन होणार असल्याचे समजते.

Traffic
Pune Airport : लवकरच मेट्रोने विमानतळावर पोहचता येणार; खडकवासला ते खराडी...

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पण टाइम थिएटरपर्यंतच्या २१०० मीटर लांबीचे काम पूर्ण झालेले आहे, मात्र हा पूल नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

या पुलाचे उद्‍घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत होते, पण त्यांची तारीख मिळाली नव्हती. फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, परंतु या काळातही हा उड्डाणपूल खुला होऊ शकला नव्हता.

Traffic
Nashik : आता पाणंद रस्त्यांचा मार्ग होणार मोकळा; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्‍घाटन केले जाईल, असा निरोप महापालिका प्रशासनाला राज्य सरकारतर्फे देण्यात आलेला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम १ मे रोजी पार पडणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

यापूर्वी पवार यांच्या हस्तेच उद्घाटन

राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे उद्‍घाटन भाजप नेत्यांच्या हस्ते होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण त्या वेळीदेखील भाजपच्या नेत्यांची वेळ न मिळाल्याने अखेर २६ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला होता. आता या प्रकल्पातील दुसऱ्या पुलाचेही उद्‍घाटन पवार यांच्या हस्तेच होत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com