Ajit Pawar : Missing Link बाबत अजित दादांनी काय दिली गुड न्यूज

Mumbai
MumbaiTendernama
Published on

पुणे (Pune) : तैवान येथील वायकॉम कंपनीने डिझाइन केलेल्या, डेन्मार्क येथील फोर्स टेक्नॉलॉजी कंपनीने विंड टनेल परीक्षण केलेल्या आणि मलेशियातील केबल (वायर) वापरण्यात येणाऱ्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. (Mumbai Pune Expressway, Missing Link Project)

Mumbai
फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांना झटका; लोकप्रिय 'आनंदाचा शिधा' योजना बंद

लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात. पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.

या पार्श्‍वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले. या प्रकल्पामुळे बोर घाटातील ६ किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होत आहे.

Mumbai
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर का वाढला अपघाताचा धोका?

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात पूर्ण होणार, अशी घोषणा केली. दरम्यान, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. या वेळी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या सद्यःस्थितीबाबत माहिती दिली.

असा आहे प्रकल्प

- या प्रकल्पांतर्गत दोन बोगदे व आठ पदरी नवीन रस्ता

- २३.५ मीटर रुंदीचे व दीड व नऊ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे

- दोन्ही बोगद्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

- दरी भागात बांधण्यात येणाऱ्या केबल दरी पुलाची लांबी ६४५ मीटर आणि उंची १८१ मीटर

- या पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे.

- काम पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार

- प्रवाशांच्या वेळेत २० ते २५ मिनिटांनी बचत होणार

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com