जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर का वाढला अपघाताचा धोका?

Accident Zone
Accident ZoneTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : निगडी ते दापोडी दरम्यान जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील (Old Pune Mumbai Highway) समतल विलगकामधून (ग्रेड सेपरेटर) बाहेर पडण्यासाठी (आउट मर्ज) आणि आत जाण्यासाठी (इन मर्ज) असलेल्या रस्त्याचे महापालिकेच्या वतीने पुनर्बांधणीचे काम गेल्या वर्षी मेमध्ये सुरू करण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत केवळ निगडी पवळे पुलापूर्वी असलेला आउट मर्जच्या ठिकाणी इन मर्जचे काम पूर्ण झाले. महापालिकेच्या कासवगतीने सुरू असलेल्या कामाचा वाहनचालकांना फटका बसत असून, मर्ज इन-आउट रस्त्यावर अपघात होत आहेत.

Accident Zone
Pune : Shivajinagar-Hinjawadi Metro मार्गाबाबत आली गुड न्यूज

पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निगडी ते दापोडीदरम्यान ११ किलोमीटरचे तीन ग्रेड सेपरेटर, आठ भुयारी मार्ग आणि दोन उड्डाणपूल बांधण्यात आले. यामुळे विनाअडथळा प्रवास करत अगदी कमी वेळात दापोडीपर्यंत जाता येते.

या मार्गावरील ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यासाठी आउट मर्ज आणि आत जाण्यासाठी इन मर्ज दिला आहे. मात्र, हे मर्ज इन-आउट सोयीचे ठरण्याऐवजी अपघातांचे कारण ठरत आहेत. मेट्रोच्या कामामुळे काही ठिकाणी मर्ज इन-आउटमध्ये बदल करण्यात आले होते, तर काही बंद करण्यात आले होते.

इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज केल्याने वाहनचालक थेट बाहेर पडतात अन् अपघात होत आहेत. महापालिकेने मे मध्ये मर्ज इन-आउट पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात केली. निगडी येथील पवळे पुलाच्या सुरुवातीला मर्ज आउटच्या ठिकाणी मर्ज इनचे काम केले.

या एकाच ठिकाणचे काम केल्यानंतर इतर ठिकाणी पुनर्बांधणीचे काम सुरूच करण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरासमोरील इन मर्जचे आउट मर्ज करण्याचे काम सुरू आहे. मात्र, तेही संथगतीने सुरू आहे.

Accident Zone
फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांना झटका; लोकप्रिय 'आनंदाचा शिधा' योजना बंद

महापालिकेकडून चौथ्यांदा बदल

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत २००८ च्या सुमारास दापोडी ते निगडी ग्रेडसेपरेटरची उभारणी केली. त्यातून बाहेर पडण्यासाठी आउट मर्ज आणि आत जाण्यासाठी इन मर्ज बांधण्यात आले आहे.

गेल्या १७ वर्षांत महापालिका प्रशासनाने आउट मर्ज आणि इन मर्जमध्ये विविध कारणास्तव चारवेळा बदल केला आहे. आउट मर्जच्या ठिकाणी इन मर्ज किंवा इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज केले. तर काही ठिकाणी आउट मर्ज आणि इन मर्ज दोन्ही एकाच ठिकाणी केले आहेत.

१७ वर्ष होऊन गेले तरी अजूनही महापालिकेला आउट मर्ज आणि इन मर्ज कोणता योग्य आणि कोणता अयोग्य याबाबत निश्‍चित करता आले नाही. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

Accident Zone
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

येथे होणार काम

- आकुर्डीतील तुळजाभवानी मंदिरासमोरील इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज करणार

- चिंचवड स्टेशनच्या पुढे गंगानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगोदर आउट मर्ज करणार

- चिंचवडकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर डीमार्ट शेजारी असलेल्या इन मर्जच्या ठिकाणी आउट मर्ज करणार

- सीटी मॉलसमोरील आउट मर्जच्या ठिकाणी इन मर्ज करणार

निगडी ते दापोडी

अंतर ः १२.५० किलोमीटर

आउट मर्ज ः १० ठिकाणी

इन मर्ज ः ८ ठिकाणी

इन-आउट मर्ज ः ६ ठिकाणी

Accident Zone
अर्थसंकल्पातून पुणेकरांच्या पदरी निराशा; पुणे-शिरूर पुलाव्यतिरिक्त...

आउट मर्ज आणि इन मर्जच्या पुनर्बांधणीचे काम अर्बन स्ट्रीटचे काम करणाऱ्या विकासकाला दिले आहे. त्यांना चार ठिकाणचे डिझाइन अंतिम करून दिले आहे. आणखी काही ठिकाणी आवश्‍यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार आहेत.

- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com