Sonai : फेरटेंडरमध्ये 86 लाखांचा तोटा; गौडबंगाल काय?

Tender Scam
Tender ScamTendernama
Published on

सोनई (Sonai) : पंधरा दिवसापूर्वी झालेल्या व्यावसायिक गाळे लिलावात भाविकांच्या प्रवेशद्वाराजवळील पंधरा व सोळा नंबरचे गाळे टेंडरमध्ये अकरा महिन्यांच्या वापरासाठी तब्बल ९७ लाख ४८ हजार रुपयास गेले असताना त्याची रक्कम संबंधिताने वेळेत न भरल्याने फेरटेंडरमध्ये देवस्थान ट्रस्टला ८६ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या अर्थपूर्ण व साखळी करून केलेल्या डावपेचांची ग्रामस्थांत व परिसरात चर्चा रंगू लागली आहे.

Tender Scam
Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगरला फडणवीस सरकारचे मोठे गिफ्ट

मागील पंधरवड्यात झालेल्या टेंडरमध्ये एक ते वीस नंबरपर्यंतचे बहुतेक गाळे दहा लाखांच्या पुढे गेलेले होते. वाहनतळ येथील चप्पल स्टँडजवळील १५ नंबरचा गाळा जीएसटीसह ७३ लाख २३ हजार ३८९ रुपयास गेला होता, तर सोळा नंबरचा गाळा जीएसटीसह २४ लाख २५ हजार ५५५ रुपयांस अकरा महिन्यांच्या पूजासाहित्य विक्रीकरिता गेला होता.

नोटीस फलकावर तसे पत्रक लावण्यात आले होते. लिलावात दोन्ही गाळे घेणाऱ्यांनी वेळेत रक्कम भरली नसल्याने दोन्ही गाळ्यांचा लिलाव रद्द करण्यात आला होता.

गुरुवार (ता. २९) रोजी रद्द झालेल्या दोन्ही गाळ्यांचा फेरलिलाव करण्यात आला असता १५ नंबरचा गाळा जीएसटीसह ९ लाख १७ हजार ७७७ रुपयास गेला, तर १६ नंबरचा गाळा जीएसटीसह दोन लाख ९ हजार ७७७ रुपयास गेला आहे.

Tender Scam
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना...

शनैश्वर देवस्थानला फेरलिलाव केल्यामधून तब्बल ८६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने गावात व परिसरात संशयास्पद चर्चेला सुरवात झाली आहे. वाहनतळातील इतर व्यावसायिक व काही कर्मचाऱ्यांबद्दल गावात उघड चर्चा रंगात आली आहे. फेर लिलावाचा पुन्हा फेरलिलाव करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

फेरलिलाव केल्याने देवस्थानचे नुकसान झालेले असले, तरी टेंडरमधील नियमानुसार आलेल्या टेंडरमध्ये सर्वाधिक रक्कम असणाऱ्यांना गाळे देण्यात आले. असा प्रकार पुन्हा होणार नाही याकरिता व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गाळ्याबाबत नियम व अटी भविष्यात बदलण्यात येतील.
- जी. के. दरंदले, मुख्य कार्यकारी अधिकारी

एक ते पंधरा नंबरच्या गाळ्याकरिता पाच लाख रुपयांच्या पुढे रक्कम भरावी, तर सोळा ते साठ नंबरपर्यंत ७५ हजार रुपयांच्या पुढे रक्कम भरावी, असा उल्लेख टेंडरमध्ये होता.
- जालिंदर बानकर, प्रशासकीय कर्मचारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com