सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे सुसाट

राज्य सरकार १,६४७ कोटी देणार; मराठवाड्यासाठी गुड न्यूज
नव्या रेल्वे मार्गाची तयारी सुरू
Railway TrackTendernama
Published on

मुंबई (Mumbai): सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाकरिता ३ हजार २९५.७४ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

नव्या रेल्वे मार्गाची तयारी सुरू
प्रवाशांची दिवाळी 'गोड' करणाऱ्या एसटीचा यंदा विक्रमी धमाका; रेकॉर्ड ब्रेक कमाई!

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यानुसार या प्रकल्पाच्या खर्चाच्या ५० टक्के हिस्सा म्हणजेच १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा अधिकचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहर शक्तीपीठ रेल्वे मार्गाशी जोडले जाणार आहे. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी ५० टक्के आर्थिक सहभागाचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.

नव्या रेल्वे मार्गाची तयारी सुरू
Water Taxi In Mumbai: आता गेटवे ऑफ इंडियाहून थेट गाठता येणार नवी मुंबई विमानतळ

या भाविकांची सोय व्हावी यासाठी सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्यात येत आहे. यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के म्हणजे ४५२.४६ कोटी रुपयांच्या आर्थिक सहभागास १० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मात्र आता विविध कारणामुळे या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने ३ हजार २९५ कोटी ७४ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले आहे.

यामध्ये १ हजार ६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा राज्य शासनाचा हिस्सा देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सुधारित अंदाजपत्रकास आणि राज्य शासनाच्या हिस्सा देण्यास मान्यता आली. ही रक्कम टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारला उपलब्ध करुन देण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com