Solapur : महापालिका आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी; कारण काय?

SMC : कार्यालयातील अभिलेखांचे गाठोडे, इतर विस्कळित पडलेल्या साहित्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत कार्यालय स्वच्छ ठेवण्याची सूचना केली.
Solapur Municipal Corporation
Solapur Municipal CorporationTendernama
Published on

सोलापूर (Solapur) : सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांच्या कार्यालयांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी शहरी नागरी समुदाय विकास (यूसीडी) विभागात आढळून आलेल्या अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यालयातील अभिलेखांचे गाठोडे, इतर विस्कळित पडलेल्या साहित्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत कार्यालय स्वच्छ ठेवण्याची सूचना केली.

Solapur Municipal Corporation
Pune : सरकारच्या सांगण्यावरून महापालिकेला 'या' कामासाठी मोजावे लागणार 95 कोटी

यावेळी त्यांनी बांधकाम व नगररचना विभागातील सर्व कागदपत्रे व फाइल्स व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या; तसेच लवकरच कॉम्पॅक्ट कपाट उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगितले. सर्व कार्यालये स्वच्छ आणि सुंदर ठेवा, कामकाज वेळेत पूर्ण करा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

मालमत्ता कर विभाग, संगणक विभाग, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग, आरोग्य विभाग, नगररचना विभाग, बांधकाम विभाग, नगर अभियंता, मंडई विभाग, मुख्यलेखापाल विभाग, मुख्यलेखा परीक्षक विभाग, अभिलेखपाल, सामान्य प्रशासन विभाग, अन्न परवाना विभाग, यूसीडी विभाग, अंतर्गत लेखापरीक्षक आदी विभागांच्या कार्यालयांची पाहणी केली.

Solapur Municipal Corporation
Devendra Fadnavis : आर्थिक शिस्त पाळत संतुलित अर्थसंकल्प मांडणार; 10 मार्चला बजेट

यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर, उपसंचालक नगररचना मनीष भिष्णूरकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आयुक्तांनी घेतली विविध विभागांची माहिती

इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला आयुक्तांनी भेट देत अंतर्गत नियंत्रण कक्ष, घंटागाडी रूट मॅप, सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणा, पाणीपुरवठा वितरण, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली, ड्रेनेज, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com