उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातील 'त्या' महत्त्वाच्या प्रकल्पालाच निधी मिळेना; कारण काय?

सातारा मेडिकल कॉलेजचे काम रखडले
satara medical collageTendernama
Published on

सातारा (Satara) : सातारा शासकीय मेडिकल कॉलेज (Satara Government Medical Collage) इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण झाली आहे; पण काम सुरू करण्यासाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील ३५० कोटी रुपयांच्या कामाला ब्रेक लागला आहे. निधीची उपलब्धता होत नसल्याने हे काम रखडण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आता एकमेकांच्या भरवशावर बसले आहे.

सातारा मेडिकल कॉलेजचे काम रखडले
Devendra Fadnavis : मुंबईच्या धर्तीवर नागपुरात व्हर्टिकल एसटीपी प्रकल्प; काय म्हणाले फडणवीस...

सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे काम नियोजित स्थळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात मूळ इमारत आणि इतर कामे मिळून ३५० कोटींचे हे काम आहे. इतर पाच जिल्ह्यांतील मेडिकल कॉलेजची कामे पूर्ण झाली आहेत; पण सातारा जिल्ह्यातील काम खोळंबले आहे. राज्य शासनाने निधीची तरतूद केली; पण निधी उपलब्धतेकडे दुर्लक्ष केले आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीच्या कामांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ३५० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून, टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या कामांमध्ये इतर कामांसाठी १५० कोटी व इमारतीच्या कामांसाठी २०० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे, तसेच कॉलेजच्या शेजारून जाणाऱ्या कालवा बंदिस्त करून त्यावर रस्ता करण्यासाठीचा प्रस्ताव आहे. याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोऱ्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यालाही अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

सातारा मेडिकल कॉलेजचे काम रखडले
स्टार एअरवेजला ग्रीन सिग्नल! सोलापुरातून देशातील 'त्या' मोठ्या शहरासाठी सुरू होणार विमानसेवा

टेंडर घेतलेल्या ठेकेदाराला काम सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाकडून वित्त विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील महायुतीच्या चार मंत्र्यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील असून, त्यांनीही मेडिकल कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच तातडीने निधी उपलब्ध होऊन काम सुरू होईल. त्यामुळे किमान पुढील वर्षी (२०२६) तरी नवीन इमारतीत मेडिकल कॉलेज सुरू होईल.

सातारा मेडिकल कॉलेजचे काम रखडले
Nashik: नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी मंत्री नितीन गडकरींनी काय घेतला निर्णय; 2 हजार 500 कोटी खर्चून...

डीनसाठी साधी केबिन

मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने जिल्हा रुग्णालयातील नियोजित पाचशे खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीत हे कॉलेज भरविले जात आहे. या कॉलेजचे डीन यांना बसण्यास एका कोपऱ्यात जागा दिली गेली आहे.

मुळात डीन यांना प्रशस्त केबिन देणे आवश्यक आहे. मात्र, इमारतीचे काम सुरू असल्याने मोठ्या पदावरील व्यक्तीला साध्या केबिनमध्ये बसावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com