
Satara
Tendernama
सातारा (Satara) : अत्यंत सुसज्ज व पर्यावरण पूरक अशा सातारा शासकिय मेडिकल कॉलेजच्या इमारतींच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यातील चारशे कोटींचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. या बांधकामाच्या टेंडरमध्ये दिग्गज कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागणार आहे.
सातारा शासकिय मेडिकल कॉलेजची मुख्य इमारत, विद्यार्थी होस्टलस॒, कर्मचारी व अधिकाऱ्यांची क्वार्टर्स, किचन आणि डायनिंग हॉल या सुविधा उभा करण्यासाठी तब्बल ४०० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरची संपूर्ण प्रक्रिया सात आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे साधारण मे महिन्यानंतर प्रत्यक्ष काम सुरु होण्याची शक्यता आहे.
सातारा शासकिस मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यासोबतच आता नियोजित साठ एकरांच्या जागेत सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकिय महाविद्यालयाचा सुसज्ज असा एकूण ४९५ कोटी रुपयांचा विविध इमारतींच्या बांधकाम आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सर्व संचालकांनीही मान्यता मिळाली आहे. बारामती व दिल्ली वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर हा आराखडा आहे. त्यामुळे या इमारतीचे विशेष आकर्षण राहणार आहे. आराखड्यातील बांधकामे चार टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षणाखाली होणार आहेत.
पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. त्यासाठी टेंडरची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. वैद्यकिय शिक्षण विभागाच्या मान्यतेने बांधकाम विभागाने ही टेंडर प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजची मुख्य इमारत, विद्यार्थी होस्टेलस॒, कर्मचारी व डॉक्टर्सचे निवासस्थान, किचन आणि डायनिंग हॉलचा यामध्ये समावेश आहे. अत्यंत सुसज्ज अशा या इमारती होणार असून त्यासाठी चारशे कोटींचे टेंडर आज प्रसिद्ध झाले आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाच्या टेंडरमध्ये दिग्गज कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असून, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे; पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर मिळविण्यासाठी कंपन्यांकडून नेते मंडळींना साकडे घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.