कोल्हापूर (Kolhapur) : खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून कोल्हापूर-शिरोली-सांगली या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या भू-संपादनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे लवकरच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होईल.
कोल्हापूर-शिरोली सांगली रस्ता खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीवरून राज्याचे केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडे वर्ग करून घेतला आहे. त्या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ क्रमांक दिला आहे.
चौपदरीकरणाच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करून डीपीआर बनविला आहे. डीपीआरनुसार काम सुरुवात करण्यासाठी भूसंपादन करावे लागत होते. भूसंपादनासाठी पुढचे काम अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे, हे लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी दिल्लीत असताना नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संतोष कुमार यादव यांची भेट घेऊन सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या भूसंपादनच्या प्रलंबित प्रस्तावास मंजुरी देऊन कामास सुरुवात करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली होती.