Kolhapur : शहरातील 16 रस्त्यांचा होणार कायापालट; 100 कोटींचा खर्च

Kolhapur
KolhapurTendernama
Published on

कोल्हापूर (Kolhapur) : शहरातील १०० कोटींच्या रस्ते कामासाठी भरलेल्या तीन टेंडरधारकांपैकी एक कंपनी अपात्र ठरली. उर्वरित दोन्ही कंपन्यांनी जादा दराचे टेंडर भरले असून त्यातील एक कंपनी निश्‍चित केली जाणार आहे.

Kolhapur
Exclusive : आरोग्य खात्याच्या 9 हजार कोटींच्या जम्बो Ambulance टेंडरसाठी 'फिल्डिंग' लागली?

शहरातील १६ रस्त्यांसाठी महापालिकेने टेंडर मागविले होते. पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला नसल्याने रिटेंडर काढण्यात आले. त्यात तीन कंपन्यांनी टेंडर भरले. त्या टेंडरची तांत्रिक छाननी केली जात होती. एका कंपनीला येथील डांबर प्रकल्पाबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते; पण ती सादर करता आली नसल्याने त्या कंपनीला अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित दोन कंपन्या या फेरीत पात्र ठरल्या. त्यांचे कोटेशन उघडल्यानंतर दोन्ही कंपन्यांनी जादा दर भरले असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी भरलेल्या दराची महापालिका पडताळणी करणार आहे. दोन दिवस सुट्या असल्याने दोन कंपन्यांपैकी एक कंपनी सोमवारनंतर निश्‍चित केली जाणार आहे.

Kolhapur
ZP Bharti 2023 : ठरले तर! राज्यातील 19 हजार पदांच्या भरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

पुढील आठवड्यात टेंडरधारक निश्‍चित करून त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. या टेंडरमध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश असल्याने या कामाकडे शहरवासीयांचे डोळे लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com