Satara : ‘लघुपाटबंधारे’कडून माण-खटावमधील टेंडर रद्द; 'जलयुक्त'मधील दहा कोटींच्या कामांना खो

Jalyukt Shivar 2.0
Jalyukt Shivar 2.0Tendernama

सातारा (Satara) : माण-खटाववर दुष्काळी उपाययोजनांबाबत अन्याय होत असताना लघुपाटबंधारे विभागाकडून तांत्रिक कारण पुढे करून माणमधील ३६ व खटावमधील १३ टेंडर रद्द करण्यात आले आहेत. साधारण नऊ ते दहा कोटी रुपयांचे टेंडर रद्द झाल्यामुळे ऐन दुष्काळात जलयुक्त शिवारच्या कामांना खो बसणार आहे.

Jalyukt Shivar 2.0
Satara : 'खंबाटकी' पार करण्यासाठी 'का' लागतोय एक तास? काय आहे कारण?

जलयुक्त शिवार अभियान २.० हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० सन २०२३-२४ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील १८६ गावांची निवड करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी ८७ अंदाजपत्रके (तांत्रिक मान्यता प्राप्त अंदाजपत्रकाची किंमत रुपये १८३४.६६ लाख) जिल्हास्तरीय समितीकडे सादर केली होती. कामांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीने शिफारस केली होती. या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, शुद्धिपत्रक काढून यातील काही टेंडर रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शुद्धिपत्रकात म्हटले आहे, की लघुपाटबंधारे विभागाकडील जलयुक्त शिवार अभियान २.० या लेखाशीर्षाअंतर्गत १ जानेवारी २०२४ ते ८ जानेवारी २०२४ कालावधीकरिता टेंडर सूचना क्र. ०५ अन्वये ६६ कामांचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. प्रसिद्ध केलेल्या टेंडरपैकी ४९ टेंडर हे तांत्रिक कारणामुळे व टेंडर स्वीकारणे अथवा नाकारणे या टेंडरमधील शर्तीमधील नमूद अटीस अधीन राहून या कामाच्या प्रसिद्ध केलेल्या ई-टेंडर रद्द करण्यात येत आहेत. फक्त माण-खटाव मतदारसंघांतील ठराविक टेंडरच रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Jalyukt Shivar 2.0
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

टेंडर रद्द झालेली कामे

माण तालुका
पाझर तलाव दुरुस्ती करणे-
पांगरी (दडस शेत), पळशी (वाण्याची झाडी),
वारुगड (गायदरा गोसावीदरा, गायदरा मलवडदरा, गायदरा महारबाई व खडकदरा), पाचवड (हंबेवस्ती व तरवडे तलाव), पळशी (सावंत वस्ती), गोंदवले खुर्द (जानाई तलाव), गोंदवले बुद्रुक (पाटील वस्ती), पिंपरी (वाकाचा मळा), भांडवली (वाघजाई), पाचवड (कातरावस्ती)

साठवण बंधारा बांधणे -
बिजवडी (रामभाऊ घाडगे घराजवळ व पाणी पुरवठा विहिरीजवळ), शिरवली (कडा व दरा), कासारवाडी (चौंडी), पळशी (सुरुख ओढा), किरकसाल (चोरमलेदरा, खोपडा, वाघजाई ओढा, जाधवमळा, इनाम, माउलीचा ओढा, म्हारकीचा ओढा, सारभूकुम मळा, जानुबाई मळा व बामनाचा ओढा) मणकर्णवाडी (चिंचेचा ओढा) येथील साठवण बंधारा दुरुस्ती करणे. भांडवली (मळा) येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती करणे.

ग्राम तलाव दुरुस्ती करणे
नरवणे, किरकसाल (कुरणाचा ओढा), स्वरूपखानवाडी (कोकरे वस्ती) व टाकेवाडी (दरा)

खटाव तालुका
साठवण बंधारा बांधणे -
डाळमोडी (सीताराम मारुती निकम शेत व जनार्दन सुदाम निकम शेत) मांडवे (राजेंद्र देशमुख शेत व शशिकांत पाटील शेत), पेडगाव (प्रभाकर मोरे शेताजवळ), सूर्याचीवाडी (पाणी पुरवठा विहिरीजवळ), यलमरवाडी (डोंगरमळा व चिमटा ओढा), बोंबाळे (विजय निंबाळकर शेताजवळ व रमाकांत निंबाळकर शेताजवळ), सूर्याचीवाडी (स्मशानभूमी जवळ), गणेशवाडी (बापू जाधव शेत) डाळमोडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दुरुस्ती करणे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com