Karad : उड्डाणपुलाचे काम मुदतीत पूर्ण करण्याचे ठेकेदारापुढे आव्हान

bridge
bridgeTendernama
Published on

कऱ्हाड (Karad) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत कोल्हापूर नाक्यावरून नांदलापूरदरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी ते काम गतीने सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. साडेतीन किलोमीटरच्या युनिक उड्डाणपुलाच्या ९२ पिरलवर हा पूल उभारण्यात येत आहे. त्यापैकी मलकापूर परिसरातील ३७ आणि कोल्हापूर नाक्यापर्यंतच्या २९ अशा ६६ पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, अद्यापही २६ पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम बाकी आहे. त्यामुळे मुदतीत काम पूर्णत्वाचे आव्हान ठेकेदारांपुढे उभे आहे.

bridge
Mumbai : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; CIDCO च्या मेगा हौसिंग स्कीमला मुदतवाढ

पुणे-बंगळूर महामार्गावरील शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर एकच उड्डाणपूल होता. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जुनाच रस्ता वापरात होता. त्यामुळे ये-जा करणारी वाहने एकाच मार्गिकेवरून शहरात येत असल्याने तेथे दररोज वाहतूक कोंडी होऊन अपघात होत होते. त्यामुळे तेथे उड्डाणपूल होण्यासाठी अनेकदा आंदोलने झाली. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. दरम्यान, सध्या सातारा- कागल या ६७ किलोमीटर रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामांतर्गत शेंद्रे ते पेठनाकादरम्यान काम सुरू आहे. सहापदरीकरणात सातारा ते कागल या टप्प्यात काँक्रिटीकरण व डांबरीकरणाचे काम होणार आहे. ही कामे शेंद्रे ते पेठ नाका आणि पेठ नाका ते कागलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ६१.९४५ किलोमीटर लांबीसाठी १६७०.८० कोटी, तर दुसऱ्या टप्प्याचा ६७ किलोमीटर लांबीसाठी १९५९.८५ कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. दोन्ही टप्प्यात २४ तासांत ९० हजार वाहने धावतात, असे गृहीत धरून नव्या मार्गाची रचना केली आहे. दोन्ही टप्प्यांतील सहापदीकरणाची कामे सुरू होती. त्या कामामुळे पुणे-बंगळूर महामार्गाची उंची वाढणार आहे. वाहनधारकांची सोय होणार आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवली आहे. सध्या त्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, त्याचा नाहक त्रास वाहनधारकांसह त्या परिसरातील नागरिक, दुचाकीस्वारांना होत आहे.

bridge
Mumbai : देशातील महागडा व्यवहार; वरळीत आलिशान पेंटहाऊसची 158 कोटीत खरेदी

६६ पिलरवर सेगमेंट

कोल्हापूर नाक्यावरून नांदलापूरदरम्यानच्या साडेतीन किलोमीटरच्या अंतरात वाहनांच्या सोयीसाठी युनिक उड्डाण उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. त्या पुलासाठी एकूण ९२ पिलर उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ६६ पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. कोल्हापूर नाक्यापासून पुढील उर्वरित २६ पिलरवर सेगमेंट बसवण्याचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण करण्याचे ठेकेदारांपुढे आव्हान असेल.

Tendernama
www.tendernama.com