Mumbai : मुंबईकरांसाठी गुड न्यूज; CIDCO च्या मेगा हौसिंग स्कीमला मुदतवाढ

CIDCO Lottery : आत्तापर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांची नोंदणी
CIDCO
CIDCOTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सिडकोने (CIDCO) महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे आता ग्राहकांनी अधिकाधिक अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

CIDCO
Mumbai : बांधकाम कामगारांच्या योजनांचा मार्ग मोकळा; हायकोर्टाच्या आदेशाने ‘तो’ निर्णय रद्द

सिडकोकडून तब्बल 26,000 घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या नावाने ही महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या नावानुसार अर्जदारांना सदनिकांकरिता पसंतीक्रम देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

सिडकोने अर्ज नोंदणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दिवाळी आणि निवडणुका यामुळे अनेकांना ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करता आलेली नव्हती. यासाठीच सिडकोने मुदतवाढ दिली आहे. सिडकोच्या घरांसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबरपर्यंत होती. आज, सोमवारी अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस होता. मात्र आता सिडकोने घरांसाठीच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे.

CIDCO
वर्किंग विमेन्ससाठी म्हाडाची गुड न्यूज; भव्यदिव्य हॉस्टेलसाठी आचारसंहितेनंतर 80 कोटींचे टेंडर

रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.

सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना 'महारेरा'ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

CIDCO
Solapur : समांतर जलवाहिनीमुळे वाचणार 15 TMC पाणी; काम महिनाभरात पूर्ण होणार?

सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लीजवर न राहता ते संबंधित व्यक्तीच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घरे विकण्यासाठी सिडकोची एनओसी आवश्यक होती. याशिवाय ही घरे विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत असे. मात्र आता अर्जदारांना ही घरे विनात्रास विकता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com