Uday Samant: सासवड-जेजुरी नगरपरिषदेच्या 'त्या' योजनेबद्दल काय म्हणाले मंत्री सामंत?

uday samant
uday samanttendernama
Published on

मुंबई (Mumbai): सासवड आणि जेजुरी नगरपरिषद क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

uday samant
Exclusive: राज्यातील कंत्राटदारांमध्ये का उडाली खळबळ? कोट्यवधींचे बनावट GR उजेडात

विधानसभा सदस्य विजय शिवतारे यांनी सासवड आणि जेजुरी नगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार प्रकल्प संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, सासवड नगरपरिषद क्षेत्रात भुयारी गटार योजनेच्या टप्पा एक मधील कामे मुदतवाढ देऊनही पूर्ण झाली नाहीत.

या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल संबधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकले जाईल. ही योजना पूर्ण करण्यासाठी नवीन टेंडर काढून यासाठी आवश्यक असणारा २० कोटी निधी मंजूर करण्यात येईल.

uday samant
Nagpur: फडणवीसांच्या नागपुरातील 'त्या' 2 उड्डाणपुलांची सरकार करणार चौकशी

सासवड आणि जेजुरी नगरपरिषदेत भुयारी गटारी योजनेच्या टप्पा २ मधील कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याबाबत नगरपरिषद व नगर विकास विभागास निर्देश दिले जातील. भुयारी गटार योजना टप्पा २ च्या कामासाठी आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून दिला जाईल.

तसेच नदी प्रदूषण संदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरविकास विभागाला निर्देश देण्यात येतील, असेही उद्योग मंत्री सामंत यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com