ST CCTV Project: 'लालपरी'च्या प्रवासाला आता डिजिटल कवच; 633 ठिकाणी बसवणार 7 हजार कॅमेरे

एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर आता राहणार डिजिटल पहारा
ST Bus, MSRTC
ST Bus, MSRTCTendernama
Published on

मुंबई (Mumbai): 'लालपरी'च्या हालचाली, बसस्थानके, विभागीय कार्यालये आदींवर आता 'तिसऱ्या डोळ्या'ची थेट नजर राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 111 कोटींच्या निधीतून राज्यातील 633 ठिकाणी तब्बल 7035 CCTV कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून राज्यातील एसचीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार असल्याने प्रवाशांसाठी ही चांगली बातमी ठरणार आहे.

ST Bus, MSRTC
Nashik: रिंगरोडसाठी थेट खरेदी पद्धतीने जमिनी घेण्यास सुरवात; 'या' गावांतील शेतकरी तयार

दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वाकांक्षी ‘सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एसटीच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

ST Bus, MSRTC
Nashik: नाशिक-पालघर प्रवास आता सुसाट!

मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी तब्बल 111 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीची बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एकूण 633 ठिकाणी तब्बल 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.

या अत्याधुनिक प्रकल्पाची जबाबदारी ई-टेंडर प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी 1 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

ST Bus, MSRTC
Nashik: कसारा घाटात आणखी 2 रेल्वे मार्गांमुळे मुंबई तासाभराने जवळ येणार

या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आले असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर केंद्रीकृत पद्धतीने लक्ष ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करता येणार आहे.

प्रकल्पाच्या पायलट टप्प्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित 27 विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे.

ST Bus, MSRTC
Pratap Sarnaik : ST महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीबाबत काय आहे नव्या परिवहन मंत्र्यांचा प्लॅन?

या प्रकल्पामुळे एसटीच्या बसस्थानकांवर आणि कार्यालयांमध्ये सुरक्षिततेचे नवे पर्व सुरू होणार आहे. प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, तो एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

यामुळे ‘लालपरी’चा प्रवास आता केवळ वेगवानच नव्हे, तर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com