अ‍ॅम्ब्युलन्स टेंडरप्रकरणी आयुक्तांची भूमिका संशयास्पद; टेंडर रद्द करून चौकशीची मागणी

Danve, Shinde
Danve, ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारने १०८ अ‍ॅम्ब्युलन्सच्या सेवेसाठी नव्याने काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. या टेंडरप्रकरणी आरोग्य विभागाच्या आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत हे टेंडर रद्द करून निःपक्षपातीपणे याची चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Danve, Shinde
Davos : जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे MOU

गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी असलेल्या १०८ रुग्णवाहिका पुरविण्यासाठी यंदा नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून नव्या ठेकेदाराला दर महा ७४ कोटी २९ लाख रुपये देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. नव्या ठेकेदाराला वर्षाला ९०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. शासन अशाप्रकारे गोरगरीब जनतेच्या आरोग्याचे संवर्धन करण्याच्या नावाखाली जनतेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी करत असल्याची टीका दानवे यांनी केली. केंद्रीय दक्षता आयोगाच्या नियमानुसार टेंडरसाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा होऊन कामाचा दर्जा वाढविण्यासाठी २१ दिवसांची कालावधी असताना सुमारे ८ हजार कोटीपर्यंतच्या टेंडरसाठी २१ दिवसांचा अवधी अपेक्षित असताना केवळ सात दिवसांत टेंडर उघडून सर्व नियम पायदळी तुडविण्यात आले.

Danve, Shinde
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

अशाप्रकारे नियमबाह्य कामकाजाला सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त, संचालक व सचिव हे खतपाणी घालण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. नियमबाह्य व मुदतीपूर्व टेंडरप्रक्रिया राबविल्यामुळे यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते त्यामुळे याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी दानवे यांनी लावून धरली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com